प्राधिकरणात एक कोटींची घरफोडी

संदीप घिसे 
रविवार, 17 जून 2018

पिंपरी (पुणे)  : दरवाजाचे कुलूप तोडून सुरक्षा रक्षकाने घरातील सुमारे एक कोटी रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना प्राधिकरण निगडी येथे रविवारी (ता.१७) उघडकीस आली.

गोविंद परिहार असे संशयित आरोपी सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. तो बन्सल अगरवाल यांच्या बंगल्यावर सुरक्षारक्षकाचे काम करत होता. कार्यक्रमासाठी अगरवाल कुटुंबीय बाहेर गेले होते. त्यावेळी संशयित आरोपी गोविंद याने दरवाजाचे कुलूप तोडून घरातील सुमारे एक कोटी रुपयांचा ऐवज चोरून नेला. कार्यक्रमावरून घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Web Title: 1 core's robbary in pcmc

टॅग्स