38 जणांची नोकरीच्या अमिषाने 1 कोटी 26 लाखांची फसवणुक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fraud

पुरंदर तालुक्यातील सासवडसह इतर 18 गावांतील 38 जणांची वन खात्यातील नोकरी मिळवून देण्याचे अमिष दाखवून सुमारे 1 कोटी 26 लाख रुपये रक्कम घेऊन फसवणुक केल्याचे प्रकरण उजेडात आले.

38 जणांची नोकरीच्या अमिषाने 1 कोटी 26 लाखांची फसवणुक

सासवड - पुरंदर तालुक्यातील सासवडसह इतर 18 गावांतील 38 जणांची वन खात्यातील (Forest Department) नोकरी (Jobs) मिळवून देण्याचे आमिष दाखवून सुमारे 1 कोटी 26 लाख रुपये रक्कम घेऊन फसवणुक (Cheating) केल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. सासवडमधील एका युवकाच्या फिर्यादीनंतर पोलीस ठाण्यात फसवणुक झालेले सारेजण हजर झाले आणि सात जणांच्या टोळीचे फसवणुक रॅकेट उघड झाले. सातपैकी पाचजणांना अटकही झाली आहे.

अविनाश चंद्रकांत भोसले (रा. पुरंदरे वाडा परिसर, सासवड, ता. पुरंदर) असे यातील मुख्य फिर्यादीचे नाव आहे. या फिर्यादीचे एकट्याचे 3 लाख 80 हजार रुपये या टोळीने वन खात्यातील नोकरीसाठी घेतले. तर बाकी 37 जणांचे असेच कमी अधिक पैसे घेतले व फसवणुक केली. हा मुख्य फिर्यादी पोलीसांकडे नसता आला तर अजून काही दिवसांत फसवणुक होणारांचा आकडा वाढला असता., असे पोलीस यंत्रणेने स्पष्ट केले.

या प्रकरणातील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे - 1) नामदेव मारूती मोरे, (वय 57, रा. मोरेवस्ती, लिंगाळी, ता.दौंड, जि.पुणे) 2) सुजाता महेश पवार, (वय 33, रा. ज्ञानेश्वर निवास रूम नं. 12. स्मशानभुमी समोर, जेजूरी, ता.पुरंदर, जि.पुणे) 3) हरीचंद्र महादेव जाधव, (वय 32, रा. मांडकी, पाटीलवस्ती, ता.पुरंदर, जि.पुणे) 4) नरेश बाबूराव अवचरे (वय 38 , रा. कोडीत, ता.पुरंदर, जि.पुणे), 5) राजेश बाबूराव पाटील (वय 60 रा. एस.आर.पी.कॅम्प 7 शेजारी बोरावकेनगर, ता.दौंड, जि.पुणे) 6) संतोश राजाराम जमदाडे (वय 34 ,रा.वीर,ता पुरंदर जि पुणे) 7) अजित गुलाब चव्हाण (वय 67, रा.वीर,ता पुरंदर जि पुणे). या सर्व सातही आरोपींनी वरील लोकांकडून एकूण रूपये 1,26,00,000 रुपये (एक कोटी सव्वीस लाख) एवढी रक्कम घेवून वन खात्यामध्ये नोकरीस लावतो., असे सांगून फसविले. त्यासाठी त्यानी बनावट नियुक्ती पत्र, ओळखपत्र, शिक्का, खाकी गणवेश असे विविध साहीत्य वापरून रोख स्वरूपात तसेच बॅक खात्यावर रक्कम घेवून लोकांचा विश्वास घात करून त्याची फसवणूक केली आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप व तपास अधिकारी विनय झिंजुरके यांनी सांगितले.

जानेवारी 2021 ते 12 मे 2022 या दरम्यान ही अनेकांची फसवणुक झाली आहे. या सातजणांच्या टोळीने सासवड सह जेजुरी, वीर, पुणे, पिंपरी चिंचवड, आदी ठिकाणी विविध नोकरी इच्छुक तरुणांची बेमालुम फसवणुक केली. नकली जाॅईनिंग लेटर, अोळखपत्र, बोगस ड्रेसकोड देऊन व त्यात इतर तरुणांचे फोटो दाखवून ही नोकरी इच्छुक तरुणांची बेमालुम फसवणुक केली. आरोपींपैकी नामदेव मारूती मोरे आणि राजेश बाबूराव पाटील हे दोघे फरारी असून बाकी पाच आरोपींना सासवड पोलीसांनी अटक केल्याचे विनय झिंजुरके यांनी सांगितले.

एका फिर्यादी अविनाश चंद्रकांत भोसले (रा. पुरंदरे वाडा परिसर, सासवड, ता. पुरंदर) यांच्या सांगण्यावर विश्वास न ठेवता 38 जणांशी समक्ष वा दूरध्वनीवर काल संपर्क करुन तुमची वनखात्यातील नोकरीसाठी पैसे घेऊन फसवणुक झाली का., याची आम्ही खात्री केली. त्यानंतरच आज फिर्याद दाखल करुन सातपैकी पाचजण अटकेत टाकले. दोघा फरारांचा शोध सुरु आहे. यातील साऱयांवर कारवाईत हयगय होणार नाही.

- विनय झिंजुरके, पोलीस उप निरीक्षक व तपास अधिकारी सासवड पोलीस ठाणे

Web Title: 1 Crore 26 Lakhs Cheating Employed 38 People Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top