इंदापूर तालुक्यातील 11 गावांसाठी १ कोटी ५ लाख रुपयांचा निधी : प्रवीण माने

राजकुमार थोरात
शनिवार, 5 मे 2018

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, अामदार दत्तात्रेय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली  इंदापूर तालुक्यामध्ये जास्तीजास्त विकास कामे करण्याचे काम सुरु असल्याचे पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी सांगितले.

वालचंदनगर : पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील मागासवर्गीय वस्तीमध्ये अंतर्गत रस्त्याच्या कामे करण्यासाठी ११ गावामध्ये १ कोटी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी दिली.

इंदापूर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास कामांचा प्रवीण माने यांनी झपाटा लावला आहे. 

गेल्या महिन्यामध्ये तालुक्यामध्ये दलित वस्तीमध्ये  सुधारणा करण्यासाठी सव्वा नऊ कोटी रुपयांचा विकास निधी खेचून आणला होता. सन २०१७-१८ च्या आर्थिक वर्षामध्ये समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून तालुक्यातील ११ गावामध्ये रस्त्यांची कामे करण्यासाठी १ काेटी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये पुढील गावांचा समावेश आहे.

रेडणी (३ लाख ), मदनवाडी (१६ लाख), कळस ( २० लाख ), शेळगाव ( ३ लाख), तरंगवाडी ( ८ लाख), रुई ( २३ लाख), कुंभारगाव ( ५ लाख), पवारवाडी ( ३ लाख), भावडी ( १० लाख), पोंधवडी ( ५ लाख), पळसदेव ( ९ लाख) रुपयांच्या निधीचा समावेश आहे.  

Web Title: 1 crore 5 lakh rupees for 11 villages in Indapur taluka