इंदापूर तालुक्यासाठी १ कोटी ८४ लाख रुपयांचा निधी

इंदापूर तालुक्यासाठी १ कोटी ८४ लाख रुपयांचा निधी

वालचंदनगर - पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या माध्यमातुन जनसुविधा विशेष अनुदान योजनेतंर्गत इंदापूर तालुक्यामध्ये नवीन ग्रामपंचायत कार्यालये, स्मशान भूमी शेड व स्मशानभूमीमध्ये सुधारणा करण्यासाठी १ कोटी ८४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. याबाबत पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी  माहिती दिली.

तालुक्यातील सहा गावामध्ये नव्याने ग्रामपंचायत कार्यालय उभारण्यासाठी ७२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.प्रत्येकी ग्रामपंचायत कार्यालयासाठी १२ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. यामध्ये डाळज नंबर - १,अवसरी, आनंदनगर, वकीलवस्ती, अगोतीनंबर - २, कौठळी या गावांचा समावेश आहे.

वकीलवस्ती, अगोतीनंबर - २, कौठळी या गावांचा समावेश आहे.
तालुक्यातील १२ गावामध्ये नव्याने स्मशानभूमी शेड बांधण्यासाठी ६७ लाख २० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. एका स्मशनाभूमी शेडसाठी ५ लाख ६० हजार रुपये खर्च करण्यात येणार असुन यामध्ये पुढील गावांचा समावेश आहे. मदनवाडी (बंडगरवस्ती), अवसरी (बेडशिंग), शेळगाव (तेलओढा), वालचंदनगर, जंक्शन, टण्णू, झगडेवाडी, गलांडवाडी (नरुटवाडी), लाकडी, निमगाव केतकी, डिकसळ, वरकुटे बुद्रुक या गावांचा समावेश आहे. तसेच स्मशानभूमीमध्ये सुधारणा करण्यासाठी १३ गावामध्ये ४५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असुन बारा गावासाठी प्रत्येकी तीन लाख रुपये  देण्यात येणार आहेत. 

यामध्ये मदनवाडी, हिंगणगाव, शेळगाव (वैदवाडी), सुरवड, तावशी, मानकरवाडी, उद्धट, गंगावळण, डाळज नंबर-१, गलांडवाडी नंबर - १, कळंब, लाकडी या गावांचा समावेश आहे.तर रुई गावासाठी ९ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जास्त जास्त विकासनिधी आणून तालुक्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे माने यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com