पुणे : 'कस्टम'कडून एक किलो सोने जप्त; एकास अटक

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 December 2019

- दुबई येथून तब्बल 41 लाख 8 हजार रुपये किमतीच्या सोन्याची तस्करी.

पुणे : दुबई येथून तब्बल 41 लाख 8 हजार रुपये किमतीच्या सोन्याची तस्करी करणाऱ्या मुंब्रा येथील एकाला सीमा शुल्क विभागाने (कस्टम) अटक केली आहे. त्याच्याकडून एक किलो 69 ग्रॅम वजनाचे सोने जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई 7 डिसेंबर रोजी करण्यात आली आहे, अशी माहिती कस्टम विभागाच्या सहआयुक्त वैशाली पतंगे यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नवाझ शमशुद्दीन पवळे (रा. ठाणे) याला याप्रकरणी अटक करण्यात आली. 7 डिसेंबरला दुबईहून येणाऱ्या स्पाईस जेटच्या विमानातून नवाझने कार एअर कॉम्प्रेसर आणला होता. येथील विमानतळावर आला तेव्हा त्यांची तपासणी करण्यात आली. त्याच्या हालचालीवरून कस्टम अधिकाऱ्यांना त्याचा संशय आला. त्यामुळे त्याने आणलेल्या कार एअर कॉप्रेसरची तपासणी केली. त्यातील तब्बल एक किलो सोने कस्टम अधिकाऱ्यांनी जप्त केले.

या मंत्र्यांना मिळणार 'हे' खातं ; अखेर खातेवाटप जाहीर..

कस्टमचे उपआयुक्त डॉ. मोतीलाल शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली शंतनू खैरे आणि माधव पालनिटकर यांच्या पथकाने ही कारवाई केले असल्याचे सह आयुक्त पतंगे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1 Kilo Gold have been seized by Custom Department in Mumbra