पोटातून काढला 10 किलोचा ट्युमरचा गोळा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

मांडवगण फराटा : मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील वरदविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या पोटातून दहा किलोंचा गोळा काढण्यात आला. अतिशय क्‍लिष्ट व मोठी शस्त्रक्रिया येथे यशस्वीपणे करण्यात आली. कानगाव (ता. दौंड) येथील सरूबाई चव्हाण यांच्या पोटामध्ये ओवेरीयन ट्यूमरची गाठ होती. त्या ट्यूमरची शस्त्रक्रिया पुण्यातील डॉक्‍टर राकेश नेवे, डॉ. भगवान पवार, डॉ. संध्या खवटे, डॉ. संपदा खवटे यांनी परिश्रम घेऊन यशस्वीरीत्या केली. त्यांना वरदविनायक हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. मनोज भोसले, डॉ. सुनील पवार, डॉ. फडके यांनी सहकार्य केले. अल्पावधीतच रुग्ण शुद्धीवर आले.

मांडवगण फराटा : मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील वरदविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या पोटातून दहा किलोंचा गोळा काढण्यात आला. अतिशय क्‍लिष्ट व मोठी शस्त्रक्रिया येथे यशस्वीपणे करण्यात आली. कानगाव (ता. दौंड) येथील सरूबाई चव्हाण यांच्या पोटामध्ये ओवेरीयन ट्यूमरची गाठ होती. त्या ट्यूमरची शस्त्रक्रिया पुण्यातील डॉक्‍टर राकेश नेवे, डॉ. भगवान पवार, डॉ. संध्या खवटे, डॉ. संपदा खवटे यांनी परिश्रम घेऊन यशस्वीरीत्या केली. त्यांना वरदविनायक हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. मनोज भोसले, डॉ. सुनील पवार, डॉ. फडके यांनी सहकार्य केले. अल्पावधीतच रुग्ण शुद्धीवर आले. पुढील उपचार वरदविनायक हॉस्पिटलमध्ये डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली सुरू असून रुग्ण व्यवस्थित आहे. 

Web Title: 10 kg tumer ball collected from the stomach