Video: अग्निशामन दलाचा देवदूत, टब अन् त्यामध्ये बाळ...

10 months baby safely rescue from Pune heavy rain
10 months baby safely rescue from Pune heavy rain

पुणे : शहरात बरसणारा धो-धो पाऊस, काळोखी रात्र, मानेएवढं पाणी आणि त्या पाण्यातून एक टब बाहेर येतो... त्यात एक बाळ असतं... तो टब हळू हळू पुढे येतो... त्यात पाणी साठलेलं असतं.. आणखी पुढे आल्यावर वर थांबलेली माणसं तो टब पकडतात आणि त्या बाळाला उचलून सुखरूप ठिकाणी आणतात... इतक्या सगळ्यात तो टब सुरक्षितपणे आणण्यासाठी त्याच्या मागे थांबलेला देवदूत दिसत नाही. पण त्या बाळाचा जीव वाचवणारा तो खरंच देवदूत आहे हे मनोमन पटून जातं..

अंगावर काटा आणणारा हा प्रसंग आहे पुण्यातील मित्रमंडळ चौकातील एका सोसायटीतील हा बाका प्रसंग... एक 10 महिन्याचं बाळ आपल्या कुटूंबासह घरात अडकलं होतं आणि घरात पाणी भरायला सुरवात झाली होती. नागरिकांना घराबाहेर काढण्यासाठी अग्निशामन दलाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू होते. अशातच या बाळाला पांढऱ्या टबमध्ये घेऊन व खाली एक सुरक्षा ट्यूब घेऊन अग्निशामन दलाचे मारूती देवकुळे देवदूतासारखे त्या बाळाला घेऊन बाहेर आले.   

'त्या बाळाच्या आजी आजोबांना पुढे सोडण्यात आलं होतं, तर आई-वडिला मागेच होते. मला माझ्यापेक्षा बाळाची जास्त काळजी वाटत होती. जेव्हा ते बाळ सुरक्षितपणे पोहोचलं, तेव्हा मला समाधान वाटलं,' असे देवकुळे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com