केडगाव (ता. दौंड) - लोकवर्गणीतून जमा झालेला दहा टन तांदूळ केरळमधील पूरग्रस्तांसाठी बुधवारी रवाना करताना मान्यवर.
केडगाव (ता. दौंड) - लोकवर्गणीतून जमा झालेला दहा टन तांदूळ केरळमधील पूरग्रस्तांसाठी बुधवारी रवाना करताना मान्यवर.

केरळसाठी दहा टन तांदूळ रवाना

केडगाव - बोरीपार्धी, चौफुला, केडगाव (ता. दौंड) येथील ग्रामस्थांकडून केरळ पूरग्रस्तांसाठी दहा टन तांदूळ आज रवाना करण्यात आला, अशी माहिती संयोजक आनंद काकासाहेब थोरात यांनी दिली.

केरळ पूरग्रस्तांसाठी बोरीपार्धी-केडगावमधून मदत फेरी काढण्यात आली. या मदतीतून दहा टन तांदूळ जमा झाले. यासाठी आनंद थोरात व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला. हा तांदूळ तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्या उपस्थितीत टेस्टी बाइट या कंपनीकडे सुपूर्त करण्यात आला. टेस्टी बाइट कंपनीच्या माध्यमातून ही मदत केरळ पूरगस्तांना दिली जाणार आहे. आनंद काकासाहेब थोरात, अनुराज कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. माणिक बोरकर, काकासाहेब थोरात पतसंस्था, केडगाव व्यापारी असोसिएशन, यशराज एंटरप्रायजेसचे सुनील सोडवनर, शिवकमल डेव्हलपर्सचे सुमीत टिळेकर यांनी प्रत्येकी एक टन तांदूळ, तर भाजपचे जिल्हा सरचिटणीस तानाजी दिवेकर, धनलक्ष्मी पतसंस्था, साधना सहकारी बॅंकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब कोळपे यांच्याकडून प्रत्येकी अर्धा टन तांदूळ या वेळी देण्यात आला. कुमार ड्रेसर्सचे किशोर सुंद्राणी यांच्याकडून कपडे तर म्हेत्रे बुकचे राहुल म्हेत्रे यांच्याकडून वह्या व पेन देण्यात आले. दौंड तालुका मेडिकल असोसिएशनतर्फे १०० किलो औषधे देण्यात आली. टेस्टी बाइट कंपनीच्या वतीने ४० हजार फूड पॅक या अगोदर देण्यात आल्याचे कंपनीचे व्यवस्थापक शंकर चक्रवर्ती, रोहिदास राजपुरे यांनी या वेळी सांगितले. काकासाहेब थोरात पतसंस्थेचे अध्यक्ष वामन जाधव, पतसंस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश अगरवाल, केडगाव व्यापारी असोसिएशनचे संतोष शिलोत आदी उपस्थित होते.

उपक्रमाचे कौतुक
तहसीलदार सोमवंशी म्हणाले, ‘‘बोरीपार्धी-चौफुला-केडगावच्या ग्रामस्थांनी मानवतेचा धर्म पाळत चांगले काम केले आहे. अन्य गावांनी त्यांचे अनुकरण करावे.’’ पोलिस निरीक्षक सूरज बंडगर म्हणाले, ‘‘या देणगीदारांनी राष्ट्र कार्य करत माणुसकीचे दर्शन घडविले आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com