आंबेगाव तालुक्‍यातील दहा गावांत टॅंकर सुरू 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

मंचर - आंबेगाव तालुक्‍यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेल्या दहा गावांत पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सुरू झाले आहेत, अशी माहिती आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या सभापती उषा रमेश कानडे यांनी दिली.

मंचर - आंबेगाव तालुक्‍यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेल्या दहा गावांत पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सुरू झाले आहेत, अशी माहिती आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या सभापती उषा रमेश कानडे यांनी दिली.

विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या सभेत पाणीटंचाईबाबत आढावा घेतला होता. जुन्नर, आंबेगाव उपविभाग (प्रांत) कार्यालय मंचर यांनी आंबेगाव तालुक्‍यातील टंचाईग्रस्त गावे जाहीर केली होती. त्यानुसार सदर गावांमध्ये टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्यासाठी वळसे पाटील यांनी शनिवारी ५ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले होते. त्यानुसार टॅंकरद्वारे वडगावपीर, मांदळेवाडी, निघोटवाडीची दस्तुरवाडी, गोहे बुद्रुक, जांभोरी, तळेघर, फलोदे, कुशिरे बुद्रुक, माळीण, पारगाव तर्फे खेड या गावांना पाणीपुरवठा सुरू झाला आहे.

Web Title: 10 village water tanker in ambegaon tahsil