CoronaVirus : पुणेकर घरातच ! पुण्यात १०० टक्के जनता कर्फ्यु

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

शहरामध्ये सकाळी सात वाजल्यापासूनच जनता संचारबंदीला सुरूवात झाली. बहुतांश दुकाने, हॉटेल्स, वाहतुक व्यवस्था, सर्व प्रकारचे व्यवहार बंद होती. तरीही नागरीकांनी गर्दी करून एकत्र थांबू नये, बंद असतानाही कोणी हॉटेल्स, दुकाने किंवा अन्य कार्यालये सुरू आहेत, का त्याची पाहणी करून ते थांबविण्यासाठी पुणे पोलिस सकाळी सात वाजल्यापासूनच गस्तीवर होते.

पुणे : कोरोना व्हायरसचा संसर्ग व प्रादूर्भाव टाळण्यासाठी रविवारी लागू केलेल्या 'जनता संचारबंदी'ला सकाळपासून पुणेकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्यामुळे संपुर्ण शहरामध्ये दुपारपर्यंत नीरव शांतता होती. तर, या संचारबंदीच्या पार्श्‍वभुमीवर पुणे पोलिसांकडून सकाळपासूनच शहराच्या कानाकोपऱ्यात गस्त घालण्यात येत होती. विशेषतः वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीच रस्त्यावर उतरून संचारबंदीवर बारकाईने लक्ष ठेवले होते. 

CoronaVirus : पुण्यातील सिंहगड पायथा परिसर पडला ओस: जनता कर्फ्यूला प्रतिसाद 
 
शहरामध्ये सकाळी सात वाजल्यापासूनच जनता संचारबंदीला सुरूवात झाली. बहुतांश दुकाने, हॉटेल्स, वाहतुक व्यवस्था, सर्व प्रकारचे व्यवहार बंद होती. तरीही नागरीकांनी गर्दी करून एकत्र थांबू नये, बंद असतानाही कोणी हॉटेल्स, दुकाने किंवा अन्य कार्यालये सुरू आहेत, का त्याची पाहणी करून ते थांबविण्यासाठी पुणे पोलिस सकाळी सात वाजल्यापासूनच गस्तीवर होते.

CoronaVirus : जनता कर्फ्युला पुण्यातील हडपसरमध्ये प्रतिसाद

शहरामधील रस्ते, चौक शांत असतानाही बहुतांश ठिकाणी वाहतुक पोलिस चौकांमध्ये थांबलेले चित्र दिसत होते. सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये पोलिस ठाण्यांच्या बीट मार्शलबरोबरच अन्य पोलिस अधिकारी व कर्मचारीही आपापल्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये गस्त घालत होते. वस्त्यांमध्ये काही प्रमाणात नागरीक एकत्र येत असल्याचे दिसल्यानंतर त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न पोलिसांकडून प्रयत्न केले जात होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 100 percent response from Pune for Janta curfew