मंचरमध्ये 100 टक्के बंदला प्रतिसाद 

manchar
manchar

मंचर (पुणे) : मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी (ता. 24) महाराष्ट्र बंदचे अवाहन केले होते. या आवाहनाला मंचरमध्ये 100 टक्के प्रतिसाद मिळाला. राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. सुनील बांगर यांच्या नेतृत्त्वाखाली मंचर शहरातून काढण्यात आलेल्या मोर्च्याला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा व मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे अशा घोषणा आंदोलकांनी यावेळी दिल्या. मोर्च्यात मुस्लीम, जैन व दलित समाजातील तरुणांचा सहभाग होता.

शिवाजी चौकात आंदोलक जमले होते. तेथून धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बाणखेले रस्ता, बाजार समिती, पिंपळगाव चौक, संभाजी चौक,  बाजारपेठ मार्गे पुन्हा आंदोलक शिवाजी चौकात आले. युवराज बाणखेले, राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संघटक अजय घुले, सुरेश निघोट, बाजीराव मोरडे, मंगेश बाणखेले, प्रवीण मोरडे, सुहास बाणखेले, दत्ता पायमोडे, अक्षय चासकर, अँड.अकबर मुजावर, जेठमल पुनामिया, राजेंद निघोट, आदी मान्यवर अग्रभागी होते. मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी सोमवारी (ता.23) औरंगाबाद जवळ असलेल्या कायगाव येथे ठिय्या आंदोलनात सहभागी झालेल्या काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरीच्या नदीपात्रात उडी घेवून आत्महत्या केली. शिंदे यांना सुरुवातीला श्रद्धांजली वाहण्यात आली.

त्यानंतर झालेल्या सभेत अॅड. सुनील बांगर यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, ''गेली दोन वर्ष शांतता मार्गाने 58 मोर्चे सुसंस्कृतपणाचे दर्शन देत. मराठा क्रांती मोर्चाने काढले. पण प्रत्येकवेळी मुख्यमंत्र्यांनी खोटी आश्वासने देऊन आंदोलकांची बोळवण केली. पंढरपुर येथे महापुजेला येवू न दिल्यामुळे रागवलेल्या मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांची बदनामी होईल अशी बेजबाबदार  व्यक्तव्य केली आहेत. राज्यात सत्तेवर असलेले सरकार जाणीव पूर्वक मराठी आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित ठेवत आहे. आंदोकांची मानसिकता शिगेला पोचली आहे. आरक्षणाचा प्रश्न तातडीने निकाली न निघाल्यास येत्या निवडणुकीत राज्य सरकारलासुद्धा जलसमाधी देण्याची ताकद मराठा समाजात आहे याची जाणीव त्यांनी ठेवावी.''

यावेळी सभेत राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संघटक  वसंतराव बाणखेले, शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष प्रभाकर बांगर यांची मनोगते झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com