‘डीवाय’च्या विद्यार्थ्यांचे शंभर प्रकल्प तयार

National Science Day
National Science Day

पिंपरी - नवे युग आंतरशाखीय अभ्यासक्रमाचे असल्याने त्याची सांगड घालत डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सुमारे १०० प्रकारचे वैविध्यपूर्ण प्रकल्प तयार केले आहेत. या प्रकल्पांना डी. पी. यु. फौंडेशन फॉर इनोव्हेशन आणि इनक्‍युबेशन इंटरप्रेन्युअर कंपनीच्या माध्यमातून पेटंट आणि स्टार्टअप मिळणार आहे. राष्ट्रीय विज्ञान (ता.२८) दिनानिमित्त या प्रकल्पाची माहिती देण्यात आली.

डॉ. पाटील शैक्षणिक संस्थेचे वैद्यकीय, दंतवैद्यकीय, अभियांत्रिकी, आयुर्वेद, फिजिओथेरपी, होमिओपॅथी, व्यवस्थापनशास्त्र, बायोटेक्‍नॉलॉजी, हॉटेल मॅनेजमेंट  महाविद्यालय कार्यरत आहे. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संशोधन करत नावीन्यपूर्ण प्रकल्प हाती घेतले आहेत.  या प्रकल्पांना वरील कंपनीमार्फत आर्थिक साहाय्य मिळवून देण्यात येत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रकल्प मार्केटमध्ये येण्याच्या मार्गावर आहेत.

विकसित देशांच्या तुलनेने भारतात पेटंट आणि स्टार्टअप यांची संख्या कमी आहे, ती वाढविण्यासाठी वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन शास्त्र या सर्व शाखेचे विद्यार्थी एकत्रितपणे संशोधन करून नावीन्यपूर्ण उत्पादन करू शकतात. त्या माध्यमातून स्टार्टअप इनोव्हेशन व स्वयंरोजगारक्षम बनू शकतात. यामुळेच डीपीयु इनक्‍युबेशन सेंटरची निर्मिती केली. या माध्यमातून विविध उद्योग क्षेत्र, कंपन्या, सरकारी व निमसरकारी संस्था, खासगी संस्थांनी या उपक्रमास प्रोत्साहन द्यावे.
- डॉ. सोमनाथ पाटील, सचिव  डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटी

सायन्स पार्कमध्ये वुमन थीमवर आज कार्यक्रम
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शुक्रवारी (ता. २८) बच्चे कंपनीसाठी चिंचवड येथील सायन्स पार्कमध्ये ‘वुमन’ या थीमवर आधारित विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यात सकाळी १० ते ३ या वेळेत राज्यस्तरीय सायन्स क्विझ, दुपारी १२ ते ५ सायन्स मॉडेल प्रदर्शन, दुपारी ३ ते ५ इंटरॲक्‍टिव्ह सायन्स डेमो, सायंकाळी ४ ते ५ सायन्स फिल्म शो आणि रात्री साडेसहा ते साडेआठ स्काय ऑब्जर्व्हेशन, अशा अनोख्या कार्यक्रमांची पर्वणी अनुभवयास मिळणार आहे. हे सर्वांसाठी विनामूल्य आहे.

पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क व मराठी विज्ञान परिषदेतर्फे रविवारी (ता. १) विज्ञान व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. सकाळी १० ते ४ या वेळेत विज्ञान रंजन स्पर्धा, सायंकाळी ४ ते ५ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे व्याख्यान होईल, तसेच सायंकाळी ७ ते ८ यावेळेत श्‍वेता देशपांडे यांचे उपशास्त्रीय गायन होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com