स्वातंत्र्यदिनी पुण्यात पीएमपीच्या नव्या 107 बस धावणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

शहर आणि पिंपरी चिंचवडमधील प्रवाशांना सुविधी देण्यासाठी पीएमपीच्या 107 नव्या बस स्वातंत्र्यदिनी (15 ऑगस्ट) मार्गावर धावणार आहेत. त्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकाच वेळी बसच्या लोकार्पणाचे कार्यक्रम होणार आहेत. ज्येष्ठ नागरिक, महिलांच्या हस्ते या नव्या बसचे उद्‌घाटन होणार आहे, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली.

पुणे : शहर आणि पिंपरी चिंचवडमधील प्रवाशांना सुविधी देण्यासाठी पीएमपीच्या 107 नव्या बस स्वातंत्र्यदिनी (15 ऑगस्ट) मार्गावर धावणार आहेत. त्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकाच वेळी बसच्या लोकार्पणाचे कार्यक्रम होणार आहेत. ज्येष्ठ नागरिक, महिलांच्या हस्ते या नव्या बसचे उद्‌घाटन होणार आहे, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली.

50 ई बस आणि 57 सीएनजीवर धावणाऱ्या बसचा त्यात समावेश आहे. पुण्यात सीएनजीच्या बसच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रम गुरुवारी महापालिकेच्या मागील बस स्थानकावर सकाळी साडेनऊ वाजता तर, पिंपरी चिंचवडमधील कार्यक्रम आंबेडकरनगर चौकात त्याचवेळी होणार आहे. दोन्ही बसचे उद्‌घाटन प्रवाशांच्या हस्ते होणार आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, पिंपरीचे महापौर राहुल जाधव आदी त्या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महापौर टिळक यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नव्या बसचा लोकार्पण सोहळा होणार होता. परंतु, त्यांना वेळ न मिळाल्यामुळे प्रवाशांच्या हस्ते बसचे उद्‌घाटन करण्याचा निर्णय घेतल्याचे टिळक यांनी स्पष्ट केले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 107 new PMP buses will run in Pune on Independence Day