सौभाग्य योजनेअंतर्गत ११ लाख वीजजोडण्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 जानेवारी 2019

पुणे - सौभाग्य योजनेअंतर्गत राज्यातील १० लाख ९३ हजार घरांना वीजजोडणी देण्याचे उद्दिष्ट महावितरणने पूर्ण केले आहे. त्यामध्ये  सर्वाधिक एक लाख ४८ हजार वीजजोडण्या पुणे जिल्ह्यात दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सौभाग्य‘ या महत्त्वाकांक्षी योजनेची सुरवात सप्टेंबर महिन्यात केली होती. या योजनेअंतर्गत महावितरणच्या वतीने डिसेंबर पर्यंत विद्युतीकरण न झालेल्या कुटुंबांना वीज देऊन राज्यात १०० टक्के विद्युतीकरणाचे उद्दिष्ट होते. त्यानुसार लाभार्थी कुटुंबांची संख्या निश्‍चित केली. अशा सर्वच लाभार्थ्यांना वीजजोडणी दिली  आहे. 

सौभाग्य योजनेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभार्थ्यांना वीजजोडणी विनाशुल्क तर इतर लाभार्थ्यांना ५०० रुपये शुल्क आकारण्यात आले. हे  शुल्क संबंधित लाभार्थ्यांकडून त्याच्या बिलातून १० टप्प्यांत वसूल करणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरातील अंतर्गत वायरिंगसह एक चार्जिंग पॉइंट, एक एलईडी दिवा मोफत दिला. तसेच ज्या ठिकाणी पारंपरिक विद्युतीकरण करणे शक्‍य नाही, अशा अतिदुर्गम भागातील घरांना सौरऊर्जा संचामार्फत वीजपुरवठा दिला असल्याचा दावा महावितरणने केला आहे.

Web Title: 11 lakh electricity connections under saubhagya scheme

टॅग्स