महिलेकडून विक्रेत्यास ११ लाख रुपयांचा गंडा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

पुणे - फेसबुकद्वारे ओळख वाढवून आयुर्वेदिक औषधी उत्पादन देण्याचा बहाणा करत महिलेने एका विक्रेत्यास तब्बल ११ लाख रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

भरत तिवारी (वय ५१, रा. गणेशखिंड रस्ता) यांनी फिर्याद दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक संतोष दराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची खडकीमध्ये फार्मास्युटिकल्स कंपनी आहे. दरम्यान, फिर्यादी यांची फेसबुकवर एका महिलेशी ओळख झाली. तिने ओळख वाढवून फिर्यादी यांना दिल्लीमध्ये आपल्या ओळखीच्या एका दुकानामध्ये आयुर्वेदिक वनस्पतीची उत्पादने मिळतात. ही उत्पादने खरेदी करण्यासाठी आपण मध्यस्थी करू असे सांगितले.

त्यानुसार फिर्यादीने उत्पादनाची खात्री करून घेतली. त्यानंतर काही उत्पादने खरेदीही केली. दरम्यान, फिर्यादी यांना संबंधित उत्पादनाची आणखी खरेदी करायची होती. त्यासाठी संबंधित महिला व तिच्या ओळखीच्या दोन व्यक्तींनी सांगितलेल्या वेगवेगळ्या बॅंक खात्यांमध्ये फिर्यादींनी वेळोवेळी साडेअकरा लाख भरले. त्यानंतर महिलेशी उत्पादन देण्यासाठी संपर्क केला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही.

Web Title: 11 Lakh Rupees Cheating by Woman Crime