पुणे : नातेवाईकांच्या हलगर्जीपणामुळे दुर्घटना, महापालिकेचा दोष नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

11 people burn case at kailas Cemetery Accident due negligence of relatives not fault of Municipal Corporation
पुणे : नातेवाईकांच्या हलगर्जीपणामुळे दुर्घटना, महापालिकेचा दोष नाही

पुणे : नातेवाईकांच्या हलगर्जीपणामुळे दुर्घटना, महापालिकेचा दोष नाही

पुणे : कैलास स्मशानभूमी येथे पेट्रोलचा भडका उडून झालेल्या दुर्घटनेमध्ये महापालिकेच्या सेवकांचा दोष नाही. ही घटना नातेवाइकांच्या हलगर्जीपणामुळे घडली असल्याचा अहवाल विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे सादर केला आहे. मात्र, ही घटना घडल्यानंतर महापालिकेचा कंदूल यांच्याशिवाय एकही अधिकारी स्मशानभूमीकडे फिरकला नाही याबद्दल अहवालात उल्लेख न करता त्यांनी क्लीनचिट देण्याचा प्रकार समोर आला आहे. शनिवारी (ता. ३०) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास कैलास स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार सुरू होते, तेव्हा त्यांच्या नातेवाइकांनी चिता पेटविण्यासाठी पेट्रोल टाकले.

त्याचा भडका उडून झालेल्या स्फोटात ११ जण गंभीर झाले आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना घडल्यानंतर स्मशानभूमीतील महापालिकेच्या कामाच्या पद्धतीवर प्रश्‍न उपस्थित होत असताना महापालिका आयुक्तांना सादर केलेला अहवाल समोर आला आहे.कैलास स्मशानभूमीत एक सुरक्षा रक्षक होता, पण त्याचवेळी तेथे ३०० ते ४०० नागरिक उपस्थित होते, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे शक्य नव्हते. विद्युत दाहिनीकडील ठेकेदारपद्धतीने घेतलेला आॅपरेटर धूर ओढून घेणारे ब्लोअर चालू करण्यासाठी ब्लोअर रूमकडे जाताना ही घटना घडली. या ठिकाणी बेकायदेशीरपणे पेट्रोलचा वापर करण्यात आला. मृताच्या नातेवाइकांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, कैलास स्मशानभूमीत झालेल्या घटनेत महापालिकेच्या सेवकांचा कोणताही दोष दिसून येत नाही, असे कंदूल यांनी अहवालात नमूद केले आहे.

अहवालात याचा उल्लेख नाही

  • घटनेची माहिती अधिकाऱ्यांना केव्हा देण्यात आली.

  • श्रीनिवास कंदूल यांना त्यांच्या अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यात आली का ?

  • घटनेच्या किती वेळानंतर कंदूल यांनी स्मशानभूमीला भेट दिली ?

  • या घटनेत विद्युत, आरोग्य व क्षेत्रीय कार्यालयाच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली?

  • नागरिकांना सावध करणारे फलक व दुर्घटना झाल्यास मदतीसाठी कोणती यंत्रणा उपलब्ध होती याची माहिती अहवालात नाही.

Web Title: 11 People Burn Case At Kailas Cemetery Accident Due Negligence Of Relatives Not Fault Of Municipal Corporation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top