esakal | थाटामाटात विवाह करणे 'असे' पडले महागात
sakal

बोलून बातमी शोधा

Crime1.jpg

कार्यमालकासह दोघांवर गुन्हा; दोन्ही कुटुंबांतील 11 जण कोरोनाबाधित 

थाटामाटात विवाह करणे 'असे' पडले महागात

sakal_logo
By
रवींद्र पाटे

नारायणगाव (पुणे) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या नियमांचे उल्लंघन करून थाटामाटात विवाह सोहळा केल्याने नारायणगाव पोलिसांनी कार्यमालक वरपिता सह्याद्री भिसे व हिवरे तर्फे नारायणगाव येथील ओसारा हॉटेलचे मालक यांच्यावर सोमवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे. 

पुण्यात फिल्मीस्टाईल थरार; खूनाचा प्रयत्न करणाऱ्याचा पोलिसांनी केला पाठलाग आणि...

सहायक पोलिस निरीक्षक डी. के. गुंड यांनी ही माहिती दिली. भिसे यांच्या मुलाचा विवाह 13 ऑगस्टला हिवरे तर्फे नारायणगाव येथील ओसारा हॉटेलमध्ये झाला. भिसे हे नारायणगावमधील प्रतिष्ठित व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते असल्याने या सोहळ्यास आजी- माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, व्यापाऱ्यांसह दोनशे जण उपस्थित होते. सोहळ्यास कोरोनाबाधित असलेली वधूची आजीही उपस्थित होती. त्यांचे नुकतेच निधन झाले. त्यानंतर आजअखेर वधूसह लग्नाला उपस्थित असलेले दोन्ही कुटुंबांतील अकरा नातेवाईक कोरोनाबाधित झाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सोमवारी रात्री गुंड यांनी ओसारा हॉटेलला भेट देत सोहळ्यास उपस्थितांची नावे असलेले रजिस्टर ताब्यात घेतले. कोरोना रुग्णांची नावे उपस्थितांच्या यादीत आढळल्याने कार्यमालक भिसे व ओसारा हॉटेलचे मालक यांच्यावर गुन्हा दाखल केला. 

होम क्वारंटाइनची सूचना 
दरम्यान, वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी भिसे परिवारातील काही व्यक्तींच्या स्वॅब तपासणीसाठी घेतले असून विवाह सोहळ्यास उपस्थित असणाऱ्या व्यक्तींनी होम क्वारंटाइन व्हावे, असे आवाहन केले आहे. 

महिनाभरातील दुसरी घटना 
जुन्नर तालुक्‍यातील धालेवाडीतील वधू व हिवरे बुद्रुक येथील वराचा विवाह सोहळा जूनमध्ये थाटामाटात झाला होता. या विवाहाला मुंबईतील कोरोनाबाधित उपस्थित होता. त्यामुळे धालेवाडी, हिवरे बुद्रुक व धनगरवाडीतील सुमारे 35 जणांना संसर्ग झाला. या प्रकरणी जुन्नर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रसंग ताजा असताना तीच चूक नारायणगाव येथील भिसे यांनी केली. मुलाचा विवाह थाटामाटात करून प्रशासनाला व स्वतःच्या नातेवाईकांना अडचणीत आणले. 

loading image
go to top