अकरा पोलिसांच्या बदल्या अखेर रद्द

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागातून ११ पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा शहर पोलिसांच्या आस्थापना मंडळाचा आदेश प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) रद्द ठरविला आहे. २४ ऑगस्टपर्यंत मूळ पदावर नियुक्तीचा आदेशही दिला.

पुणे - गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागातून ११ पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा शहर पोलिसांच्या आस्थापना मंडळाचा आदेश प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) रद्द ठरविला आहे. २४ ऑगस्टपर्यंत मूळ पदावर नियुक्तीचा आदेशही दिला.

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागातील २४ कर्मचाऱ्यांची शहर पोलिसांच्या आस्थापना मंडळाने ३१ मे रोजी शहरातील विविध ठाण्यांत नियुक्ती केली होती. त्याविरोधात ११ कर्मचाऱ्यांनी ‘मॅट’ न्यायालयात दाद मागितली. त्याबाबतची सुनावणी ‘मॅट’चे सदस्य ए. पी. कुऱ्हेकर यांच्यासमोर झाली. त्या वेळी त्यांनी बदल्यांचा आदेश रद्द केला. तसेच, ११ कर्मचाऱ्यांना गुन्हे शाखेत दोन आठवड्यांत हजर करून घ्यावे, असा आदेश शहर पोलिसांना दिला. ॲड. पूनम महाजन यांनी कर्मचाऱ्यांची बाजू मांडली. तर, शहर पोलिसांतर्फे ॲड. क्रांती गायकवाड यांनी बाजू मांडली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11 Police Transfer Cancel