पुणे-सोलापूर मार्गावर शाळेच्या रिक्षाला अपघात, ११ विद्यार्थी जखमी

Pune Accident News
Pune Accident News

राज्यात ऑफलाईन पद्धतीने शाळा सुरू झाल्याने वर्गांमधील गर्दी वाढली आहे. प्राथमिक आणि माध्यमिक वर्गांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्याही वाढल्याने शाळेत नेण्या-आणण्यासाठी पालक आणि रिक्षावाले काकांची धांदल उडत असते. मात्र, आज पुण्याच्या उरुळी कांचनमध्ये शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत दुर्घटना घडली आहे. (Pune Accident News)

सकाळच्या वेळी मुलांना शाळेत घेऊन निघालेल्या रिक्षाला अपघात झाला. या दुर्घटनेत ११ विद्यार्थी जखमी झाले आहेत. पुणे-सोलापूर महामार्गावरील उरळीकांचन येथे हा प्रकार घडला. खेडेकर मळा परिसरात ही रिक्षा रस्त्याच्या बाजूला धडकली.

चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघात झाल्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी विद्यार्थ्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात हालवलं. काही विद्यार्थ्यांना जबर मुका मार लागला आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com