रोपे जगविल्याबद्दल 11 विद्यार्थिनींना ग्रामस्थांकडून सायकली भेट

bicycle
bicycle

पाईट (पुणे) :  चांदूस येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील 11 विद्यार्थिनींनी मागील वर्षी मिळालेल्या रोपांचे योग्यरीतीने संवर्धन करून रोपे जगविल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांना सायकली भेट दिल्या. 

मागील वर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चांदूस येथे मुलींना वृक्ष भेट देऊन त्यांचे चांगले संगोपन करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. झाडे जगवली तर मुलींना सायकल भेट देण्याचे ग्रामस्थांनी जाहीर केले होते. त्यानुसार शाळेतील 11 विद्यार्थिनींनी झाडांचे संवर्धन केल्याने शाळेतील या मुलींना मान्यवर ग्रामस्थ व उद्योजकांच्या हस्ते सायकलवाटप करण्यात आले. 

यासाठी चांदूस ग्रामस्थ व तुलसी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गोरक्ष शेठ बढे, उपाध्यक्ष निशांत गारगोटे, प्रभाकर लांड़गे, उद्योजक माउली व्यवहारे, रमेश टोपे, गणेश डावरे, सुभाष टोपे आणि अरुण जोरी याचे मोलाचे सहकार्य लाभले.

या वेळी गावातील आजी माजी सरपंच, उपसरपंच तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, छत्रपती ग्रुप चांदुसचे कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. वृक्षसंवर्धन उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले. शाळेचे मुख्याध्यापक राजेश जंगले यांनी आभार मानले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com