मित्राला भेटायला आला अन् लिफ्टमध्ये अडकला

pune.jpg
pune.jpg

पुणे : मित्राला भेटायला गेलेला अकरा वर्षांचा मुलगा लिफ्टमध्ये अडकल्याची घडना घडली. आज(मंगळवार) सायंकाळी येवलेवाडीत हा प्रकार घडला. अग्निशमनदलाच्या अथक प्रयत्नानंतर मुलाची सुटका झाली. साहिल पोटफोडे असे मुलाचे नाव आहे. 

साहिल सांयकाळी आपल्या मित्राला भेटायला गेला होता.  श्री सृष्टी सोसायटी या अकरा मजली इमारतीच्या लिफ्टने मित्राच्या घरी जात होता.अचानक, लिफ्टची गियर वायर तुटल्याने चौथ्या मजल्यावर अडकला होता. रहिवाशांनी याची खबर अग्निशमन दलाला देताच कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्राचे जवान तातडीने वर्दीच्या ठिकाणी पोहोचले.

श्री सृष्टी सोसायटी येथे पोहचल्यावर जवानांनी साहिलला आवाज देऊन तो व्यवस्थित असल्याची खात्री केली. लगेच पाचव्या मजल्यावर जवानांनी धाव घेऊन मोठ्या दोरखंडाच्या साह्याने लिफ्टला बांधून स्थिर करत जास्त धोका होणार नाही याची खात्री केली. नंतर हायड्रोलिक बोल्ड कटर, सर्क्युलर सॉ व टुल किट वापरुन लिफ्टची जाळी व पत्रा कापून साहिलची सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर सुखरुप सुटका केली. 

सदर कामगिरीमधे कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्राचे वाहन चालक शरद गोडसे तसेच जवान अजित बेलोसे, निलेश लोणकर, मंगेश टकले, रवि बारटक्के यांनी सहभाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com