पुण्यात पावसाचा जोर; भिडे पूल पाण्याखाली

सचिन बडे
सोमवार, 16 जुलै 2018

पुणे : सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. यामुळे डेक्कन येथील बाबा भिडे पुलावरील वाहतूक पोलिसांनी बंद केली आहे. सायंकाळी सहापर्यंत भिडे पूल वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याने या कालावधीत वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा लागेल. 

सकाळी साडेआठ ते साडेअकरा या तीन तासांमध्ये पुण्यात 11.2 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. दुपारी तीनपर्यंत अंदाजे दहा हजार क्‍युसेक पाणी खडकवासला धरणातून सोडले जाणार आहे. यामुळे बाबा भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्‍यता आहे. 

Image may contain: 1 person, sitting, tree and outdoor

Image may contain: one or more people, people standing, ocean, sky, outdoor, water and nature

Image may contain: outdoor

Image may contain: motorcycle and outdoor

पावसाचा वाढलेला जोर आणि धरणातून होणारा विसर्ग यामुळे पोलिसांनी नदीपात्राच्या रस्त्यावर लावलेली वाहने हलविण्याच्या सूचना दिल्या. नदीपात्रात पाणी वाढल्याने मेट्रोचे कामही बंद करण्यात आले. 

Web Title: 11.2 ML rainfall in Pune within three hours