महाराष्ट्र साहित्य परिषदेचा वर्धापन दिन साजरा होणार डिजिटली; कसा? वाचा सविस्तर

महाराष्ट्र साहित्य परिषदेचा वर्धापन दिन साजरा होणार डिजिटली; कसा? वाचा सविस्तर

पुणे -  महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था, असा नावलौकिक असलेली महाराष्ट्र साहित्य परिषद बुधवारी 114 वा वर्धापन दिन डिजिटल स्वरुपात साजरा करणार आहे. तसेच विविध कार्यक्रमही फेसबुक पेज आणि यू-ट्यूब चॅनेलवर रसिकांना पाहता येणार आहेत. 

मसापच्या वर्धापन दिनानिमित्ताने दरवर्षी ग्रंथ आणि ग्रंथकार पुरस्कार, मसाप जीवनगौरव पुरस्कार आणि डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार प्रदान केले जातात. परिषदेचा वर्धापन दिन रसिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. या वर्षी ज्येष्ठ हिंदी साहित्यिक अशोक वाजपेयी उपस्थित राहणार होते. पण, कोरोनामुळे वर्धापनदिन रद्द केला. या पुढील कार्यक्रमांचा आस्वाद रसिकांना तंत्रज्ञानातून घरबसल्या घेता येणार आहे, अशी माहिती मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

प्रा. जोशी म्हणाले, "परिषदेला साहित्याभिमुख, लोकाभिमुख करताना मसापने पाच वर्षांपासून तंत्रज्ञानाची कास धरली. साहित्य सेतूच्या सहकार्याने संकेतस्थळ विकसित केले. फेसबुकपेज आणि व्हाट्‌सऍप ग्रुप सुरू केला. 

यू ट्यूब चॅनेलही सुरू केले. मसाप गप्पा, एक कवी एक कवयित्री, कथासुगंध या कार्यक्रमांना रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. अनेक मान्यवर सहभागी झाले. शालेय विद्यार्थ्यांसाठी लेखक आपल्या भेटीला हा उपक्रमही यशस्वी झाला.' 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनानंतरही गर्दी टाळणे गरजेचे असल्याने ऑनलाइन कार्यक्रमांचा आस्वाद रसिकांना घेता येईल. पाच वर्षांत मसापने शाखांतून साहित्य चळवळ ग्रामीण भागात गतिमान केली. तिथल्या शैक्षणिक संस्थांबरोबर साहित्य सामंजस्य करार केले. या चळवळीत विद्यार्थी, शिक्षकांना सहभागी केले. शून्य खर्चाची शिवार साहित्य संमेलने गावोगाव घेतली. हे सर्व उपक्रम भविष्यातही काळाची गरज ओळखून तंत्रज्ञानाच्या साहायाने सुरूच राहतील, असे जोशी यांनी सांगितले. 

बैठकाही होणार ऑनलाइन 
मसापचे कार्यक्षेत्र पुण्यासह सोळा जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यांच्या प्रतिनिधींसह 'मसाप'चे सध्याचे कार्यकारी मंडळ 33 सदस्यांचे आहे. कोरोनाच्या काळात आंतरजिल्हा प्रवास बंदी आहे. त्यामुळे कार्यकारी मंडळाच्या बैठकाही भविष्यात ऑनलाइन घ्याव्या लागतील. या सर्व बदलांसाठी मसाप सज्ज असून, साहित्य रसिकांची सेवा सुरू राहणार असल्याचे प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com