खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 August 2020

पुणे जिल्ह्यातील खडकवासला (1.97 टीएमसी), कळमोडी (1.51 टीएमसी) आणि वीर ही तीन धरणे (9.34 टीएमसी) पूर्ण क्षमतेने भरली आहेत. ​

पुणे : खडकवासला धरण (Khadakwasla Dam) साखळीतील पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस होत असून, बुधवारच्या तुलनेत गुरुवारी (ता.13) चार धरणांमधील पाणीसाठ्यात सुमारे दीड अब्ज घनफूट (टीएमसी) ने वाढ झाली. टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांत सध्या 20.04 टीएमसी (66.58 टक्के) इतका पाणीसाठा आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

घाटमाथ्यावर मुसळधार, तर उर्वरीत महाराष्ट्रात 'असा' बरसणार पाऊस​

पुणे जिल्ह्यातील खडकवासला (1.97 टीएमसी), कळमोडी (1.51 टीएमसी) आणि वीर ही तीन धरणे (9.34 टीएमसी) पूर्ण क्षमतेने भरली आहेत. खडकवासला धरणातून गुरुवारी सायंकाळी मुठा नदीतून 11 हजार 705 क्युसेकने
विसर्ग वाढविण्यात आला आहे. कळमोडी धरणातून 766 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. वीर धरणातून सहा हजार 900 क्युसेकने नीरा नदीत विसर्ग सुरू आहे. नदीपात्रात कोणी जाऊ नये. तसेच वाहने पार्किंग करू नयेत असा सतर्कतेचा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून देण्यात आला आहे.

Image may contain: text that says "आ.व्य.प्र./231 /2020. जिल्हाधिकारी कार्यालय पुणे (आपत्ती व्यवस्थापन शाखा) दरध्वनी B-Mail-controrompune@gmail.com दिनांक:- 13/08/2020. तहसिलदार, शहर/ हवेली /शिरूर/दौंड 2) आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, महानगरपालिका, पुणे. देण्याबाबत... उपरोक्त विषयान्वये, धरणामधून आज सायंकाळी असल्याने धरणातून सोडण्यात विषय सावधानतेचा जिल्ह्यातील खडकवासला भरलेले आहे त्यामुळे सध्या खडकवासला 11705 क्युसेक सोडण्यात आला आहे. धरण क्षेत्रात पाऊस होत विसर्गामध्ये होऊ शकतोय नोंद घेण्यात सतर्कतेचा देण्यात पात्रात कोणीही जाऊ नये अथवा फिरू नये, तसेच नदी पात्रात वाहने पार्किंग त्याअनुषंगाने योग्यती कार्यवाही करण्यात यावीहिविनंती. नये. यासाठी (विठ्ठलबनोटे Bne जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी,पुणे"

श्रावणात घन निळा बरसला; पुण्यात दिवसभर पावसाची संततधार!​

खडकवासला धरण साखळीतील चार धरणांमध्ये गुरुवारी सायंकाळी एकूण 20.04 टीएमसी पाणीसाठा झाला असून, हे प्रमाण 68.73 टक्के इतके आहे. टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळी आठ ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत 60 मिलिमीटर, वरसगाव 81, पानशेत धरणाच्या क्षेत्रात प्रत्येकी 82 मिलिमीटर आणि खडकवासला धरण क्षेत्रात सकाळपर्यंत 29 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. खडकवासला प्रकल्पात गतवर्षी 13 ऑगस्टअखेर 29.15 टीएमसी (100 टक्के) पाणीसाठा होता. 

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा (टीएमसीमध्ये) कंसात टक्केवारी :
टेमघर 1.84    (49.50)
वरसगाव 8.07   (62.97)
पानशेत 8.15   (76.58)
खडकवासला 1.97  (100)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इतिहास घडवला; मोडला अटलबिहारी वाजपेयींचा विक्रम​

कोयना धरणातील पाणीसाठा कालच्या तुलनेत दोन टीएमसीने वाढला असून, 73.61 टीएमसीवर (73.52 टक्के) झाला आहे.‌ तर, उजनी धरणातील पाणीसाठ्यात पाऊण टीएमसीने वाढून तो 16.15 टीएमसीपर्यंत (30.14 टक्के) पोचला आहे.

इतर प्रमुख धरणांतील पाणीसाठा : (कंसात टक्केवारी)
भामा आसखेड 4.35 (56.76)
पवना 4.78 (56.20)
डिंभे 6.56 (52.54)
मुळशी 13.47 (72.98)
नीरा देवधर 7.21 (61.45)
भाटघर 17.32 (73.72)
वीर  9.34 (99.29)   
वारणावती 23.12 (84.02)
दूधगंगा 21.23 (88.51)
राधानगरी 7.29 (98.64)

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11705 cusecs water released from Khadakwasla dam to Mutha river on Thursday evening