शहरात स्वाइन फ्लूने १२ रुग्ण अत्यवस्थ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मार्च 2017

पुणे - स्वाइन फ्लूच्या १२ अत्यवस्थ रुग्णांवर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. शहरात आतापर्यंत १२० रुग्णांमध्ये स्वाइन फ्लूचे निदान झाले असून, त्यापैकी ७० रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे स्वाइन फ्लूची भीती न बाळगता तो होणार नाही, यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. 

शहरात गेल्या काही दिवसांपासून दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानामध्ये तिपटीपेक्षा जास्त फरक होत आहे. असे वातावरण स्वाइन फ्लूच्या ‘एच१एन१’ विषाणूंच्या वाढीसाठी पोषक असते. त्यामुळे सध्या शहर आणि परिसरात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे; पण परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी घाबरून जायचे कारण नसल्याचा दिलासाही पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आला आहे. 

जानेवारीपासून आतापर्यंत शहरात दोन लाख पाच हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी स्वाइन फ्लूची स्पष्ट लक्षणे असणाऱ्या दोन हजार ६८२ रुग्णांना टॅमिफ्लू हे औषध दिले आहे. तर ५८३ रुग्णांच्या घशातील द्रवपदार्थाचे नमुने तपासण्यासाठी घेतले. त्यातील १२० रुग्णांना स्वाइन फ्लू झाल्याचा अहवाल वेगवेगळ्या प्रयोगशाळांनी दिला आहे, अशी माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. स्वाइन फ्लूच्या १८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या व्यतिरिक्त १२ रुग्णांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले असल्याचेही विभागाने कळविले आहे. 

Web Title: 12 serious cases of swine flu in the city