आठ महिन्यांत बाराशे तक्रारी

Crime
Crime

पिंपरी - एका नायजेरियन तरुणाने मॅट्रीमोनी साइटवरून एका तरुणीशी ओळख वाढवून तिची आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार वाकडमध्ये काही दिवसांपूर्वी घडला. या एकाच घटनेपुरते सायबर गुन्हे मर्यादित नाहीत, तर गेल्या आठ महिन्यांमध्ये पोलिसांकडे सायबर गुन्ह्यांशी निगडित तब्बल एक हजार २७३ तक्रारी दाखल झाल्या आहेत. किंबहुना, आयटी शहर म्हणून बिरुदावली मिरविणाऱ्या पिंपरी- चिंचवडमध्ये या गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

पोलिसांत दाखल होणाऱ्या सायबर गुन्ह्यांची संख्या आता दररोज पाच ते सहावर गेली आहे. पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी, प्राधिकरण, वल्लभनगर, हिंजवडी, तळवडे या परिसरामध्ये सध्या नोकरीनिमित्त व अन्य कारणांमुळे उच्चशिक्षित महिलांचे ‘पेइंग गेस्ट’ व स्वतंत्र राहण्याचे प्रमाण मोठे आहे.

सातत्याने ऑनलाइन राहणाऱ्या तसेच सोशल मीडियावर ‘ॲक्‍टिव्ह’ असणाऱ्या महिलांना हेरून ‘हॅकर्स’ त्यांची फसवणूक करतात. मॅट्रीमोनी, फेसबुक, व्हॉट्‌सॲप, इन्स्टाग्राम, गुगल पे आदीच्या माध्यमातून विविध प्रकारचे मीम्स, फसव्या जाहिराती करून तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचे प्रमाण लक्षणीय आहे.

अशी होते फसवणूक 
  सोशल मीडियावरून भेटवस्तूंचे आमिष दाखविणे
  विविध ॲपवरून मैत्री आणि चॅटिंग करून आर्थिक फसवणूक करणे
  विवाह जुळविण्याच्या निमित्ताने डाटा चोरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com