आनंदाची बातमी : पंजाबमधले गलई व्यावसायिक महाराष्ट्राच्या मातीत परतणार!

संतोष शाळिग्राम
Monday, 18 May 2020

औरंगाबाद, नगर, बुलडाणा, जालना, उस्मानाबाद, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या दहा जिल्ह्यांतील हे बाराशे नागरिक आहेत.

पुणे : गेल्या तीन दशकांहून अधिककाळ पंजाबमध्ये सोन्याशी निगडित व्यवसाय करणाऱ्या मराठी नागरिकांचा परत येण्याचा मार्ग खुला झाला आहे. मूळचे पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूरसह दहा जिल्ह्यातील सुमारे बाराशे नागरिक उद्या रेल्वेने महाराष्ट्रकडे निघणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद असल्याने परराज्यातून नागरिक आपल्या त्यांच्या राज्यांत परतू लागले आहेत. पंजाबही त्याला अपवाद नाही. महाराष्ट्रातील विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील अनेक मराठी लोक तिथे सोने वितळविण्याचा, हॉल मार्किंगचा व्यवसाय करतात. कोरोनामुळे राज्यबंदी असल्याने त्यांना महाराष्ट्रात परत येणे कठीण झाले होते. मूळचे महाराष्ट्रातील असलेले परंतु पोलिस दलातील उच्चपदस्थ (आयपीएस) अधिकारी डॉ. केतन पाटील त्यांच्या मदतीला धावले.

- 'घरी जाण्याची घाई करू नका'; मुख्यमंत्र्यांनी का केलं असं आवाहन?

गेल्या तीन महिन्यांपासून हे लोक गावी परतण्यासाठी प्रयत्न करीत होते. परंतु सरकारकडून परवानगी मिळण्यात अडचणी येते होत्या. डॉ. पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. पंजाब सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि अखेर एक हजार मराठी नागरिकांना महाराष्ट्रात येण्याची परवानगी मिळाली आहे. रेल्वेने उद्या दुपारी दोन वाजता हे सर्वजण महाराष्ट्राकडे निघतील आणि चाळीस तासांचा प्रवास करून ते आपापल्या घरी पोचतील.

डॉ. केतन पाटील 'सकाळ'शी बोलताना म्हणाले, "मार्च महिन्यापासून हे लोक परत जाण्यासाठी प्रयत्न करीत होते. काहीजणांनी परतण्यासाठी बसही केली. पण ऐनवेळी चालकाने मोबाइल बंद ठेवला. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात परत जाता आले नव्हते. त्यानंतर रेल्वेचे बुकिंग करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यातही तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या. या सर्व मुद्द्यांवर केंद्र सरकार, पंजाब सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि त्यातून मार्ग काढला आहे."

- Big Breaking : दहावी-बारावीच्या परीक्षा होणार जुलैमध्ये; वेळापत्रक जाहीर!

औरंगाबाद, नगर, बुलडाणा, जालना, उस्मानाबाद, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या दहा जिल्ह्यांतील हे बाराशे नागरिक आहेत. त्यातील सातशे जण हे पश्चिम महाराष्ट्रातील आहेत, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

पंजाबमधील मराठी व्यावसायिक संदीप पाटील यांनी सांगितले, की गेली तीन महिने व्यवसाय बंद आहे. आई-वडील, नातेवाइक महाराष्ट्रात आहेत. घरची ओढ लागली आहे. परंतु राज्यबंदीमुळे परत जाता येत नाही. त्यासाठी केतन पाटील यांनी खूप प्रयत्न केले. आता आम्हाला गावी जाता येणार आहे.

- मराठमोळ्या संशोधकांनी शोधला N-95 मास्कला पर्याय; पुण्यात घेतलं जाणार उत्पादन!

Image may contain: Sambhaji Patil, hat

(डॉ. केतन पाटील)

अमृतसरहून एक हजार मराठी बांधवांना घेऊन मंगळवारी रेल्वे महाराष्ट्राकडे निघेल. नगर, पुणे, सातारा आणि सांगली या ठिकाणी रेल्वे थांबेल. प्रत्येक ठिकाणी नागरिक त्यांच्या गावी परततील.
डॉ. केतन पाटील (सहायक पोलिस महानिरीक्षक, अमृतसर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1200 Marathi peoples engaged in gold related business in Punjab will leave for Maharashtra by train on Tuesday