टाटा टेक्‍नॉलॉजीकडून १२५ कोटी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

बारामती - शारदानगर येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टमध्ये तब्बल १५० कोटी खर्चून ॲग्रिकल्चरल रिसर्च ॲण्ड इनोव्हेशन सेंटर उभारले जाणार आहे. यातील १२५ कोटींचा खर्चाचा भार सिंगापूर येथील टाटा टेक्‍नॉलॉजी उचलणार आहे.

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी गुरुवारी शारदानगर येथील अप्पासाहेब पवार सभागृहात या आगामी नावीन्यपूर्ण प्रकल्पाची माहिती दिली. विद्या प्रतिष्ठान व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या वतीने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प येत्या काळात होणार आहे. 

बारामती - शारदानगर येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टमध्ये तब्बल १५० कोटी खर्चून ॲग्रिकल्चरल रिसर्च ॲण्ड इनोव्हेशन सेंटर उभारले जाणार आहे. यातील १२५ कोटींचा खर्चाचा भार सिंगापूर येथील टाटा टेक्‍नॉलॉजी उचलणार आहे.

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी गुरुवारी शारदानगर येथील अप्पासाहेब पवार सभागृहात या आगामी नावीन्यपूर्ण प्रकल्पाची माहिती दिली. विद्या प्रतिष्ठान व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या वतीने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प येत्या काळात होणार आहे. 

पवार म्हणाले, ‘‘या प्रकल्पामधून विद्या प्रतिष्ठान व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण संशोधन करण्याची संधी मिळेल. तसेच विज्ञान व तंत्रज्ञानाचे कौशल्य विकसित करण्याची संधी आणि कृषी व अभियांत्रिकीत आज जी आव्हाने येत आहेत, त्यावर मात करण्यासाठी नावीन्यपूर्ण प्रयोग व संशोधन करता येतील. हा प्रकल्प उभारला तर येत्या काळात शेतीमध्ये नवीन पिढी नवा विचार, नवे तंत्र घेऊन येईल. त्यात संशोधन करतील, अन्य क्षेत्रातही जातील.’’

या प्रकल्पासाठी १५० कोटींचा खर्च येणार आहे. त्यामध्ये टाटा टेक्‍नॉलॉजी सिंगापूर यांनी १२५ कोटींपर्यंत सहकार्याचे आश्वासन दिले असल्याने उर्वरित निधी संस्थेने गोळा करण्यासाठी विश्वस्तांची एकत्रित बैठक घ्यावी, अशी सूचना शरद पवार यांनी ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार व मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे यांना केली.

टाटा टेक्‍नॉलॉजीच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या सायन्स टेक्‍नॉलॉजीमध्ये कार्यरत असलेल्या राजेंद्र जगदाळे यांचा बारामतीत शेती, शिक्षण, उद्योग यांचा समन्वय साधणारे नावीन्यपूर्ण प्रशिक्षण मिळावे, असा आग्रह होता. त्यातून झालेल्या बैठकीनंतर ॲग्रिकल्चरल ट्रस्ट व विद्या प्रतिष्ठान यांनी एकत्रित प्रकल्प उभारण्याची कल्पना पुढे आली. 
- शरद पवार, माजी केंद्रीय कृषिमंत्री

टाटा, बजाज, शिर्के, पवार कुटुंबीय
देशातील औद्योगिक क्षेत्रात वरच्या स्थानावर असलेला टाटा परिवार आपल्या उत्पन्नातील ९९ टक्के वाटा हे देशाच्या सार्वजनिक सामाजिक कामावर खर्च करतो आणि बजाज फाउंडेशनही तशाच प्रकारे काम करते. त्यातून बारामती आणि एकूणच सामाजिक कामासाठी त्यांनी अनेकदा मोठमोठी मदत पवार कुटुंबीयांच्या सामाजिक कामास केली.

या आठवणींना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उजाळा दिला. ते म्हणाले, ‘‘बारामतीत होऊ घातलेल्या कृषी संशोधन व नावीन्यपूर्ण संस्थेसाठी १५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी १२५ कोटी सिंगापूरमधील टाटा टेक्‍नॉलॉजी ही संस्था देणार आहे. टाटा ट्रस्टने आतापर्यंत २५ हजार सायकली ग्रामीण भागातील विद्यार्थिनी, आशा स्वयंसेविकांना पुरविल्या.

नव्याने उभारले जात असलेल्या सेंटर फॉर डेअरी एक्‍सलन्सला टाटा ट्रस्टने सात कोटी ९६ लाखांचे अनुदान दिले. टाटा ट्रस्ट एवढ्यावरच थांबली नाही, तर आज पायाभरणी झालेल्या इनक्‍युबेशन सेंटरमधील नव्या संशोधनासाठी टाटा ट्रस्टने तीन कोटी ७५ लाख रुपयांचे अनुदान दिले आहे. याखेरीज जमीन सुधारणा, नाल्याचा गाळ, विहिरी खोल करण्यासाठी दोन कोटी ४५ लाख रुपयांची साधने दिली. एकूणच या एकाच वर्षात टाटा ट्रस्टने १४ कोटी १० लाख रुपयांचे आर्थिक साह्य केले आहे.’

स्वतःहून फोन करून मदतीची विचारणा...
ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या अप्पासाहेब पवार सभागृहाचे संपूर्ण बांधकाम बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्‍शनने करून दिले. आता नर्सिंग महाविद्यालयाच्या इमारत व वसतिगृहाची गरज आहे, त्यासाठी १५ कोटींची आवश्‍यकता आहे. तर, त्यामध्ये पुन्हा शिर्के यांनी वसतिगृहासाठी सहा कोटी, तर बजाज फाउंडेशनने पाच कोटींची तयारी दाखवली आहे. बजाज ट्रस्ट हे तर फेब्रुवारी महिना सुरू झाला, की स्वतःहून फोन करून काही मदत हवी आहे काय, अशी विचारणा करतात. फक्त आपल्यालाच नाही, तर इतरांनाही करीत असतील. मात्र, गेल्या आठ ते नऊ वर्षांत दर वर्षी न मागता बजाज ट्रस्टकडून सामाजिक कामासाठी पाच कोटींचे अनुदान मिळते. अशा दानशूरांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.

Web Title: 125 Crore help by Tata Technology