पवना धरणसाठ्यात अवघी सव्वा टक्‍क्‍यांनी वाढ

संदीप घिसे 
सोमवार, 2 जुलै 2018

पिंपरी (पुणे) : पवना धरण परिसरात 1 जूनपासून 346 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर धरण साठ्यात अवघी 1.3 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. सध्या धरणात 21.46 टक्‍के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. 

पिंपरी (पुणे) : पवना धरण परिसरात 1 जूनपासून 346 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर धरण साठ्यात अवघी 1.3 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. सध्या धरणात 21.46 टक्‍के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. 

पिंपरी चिंचवड शहराला पवना धरणातून पाणी पुरवठा होतो. यासाठी दरमहा 10 टक्‍के पाणी लागते. सध्या धरणात 21.46 टक्‍के इतका पाणीसाठा शिल्लक असून तो दोन महिने म्हणजे 31 ऑगस्ट पर्यंत पुरणार आहे. तसेच धरणात एक टीएमसी मृत पाणीसाठा असून तो दोन महिने पुरू शकेल. यामुळे ऑक्‍टोबरपर्यंत सध्याचे पाणी पुरणार आहे. तसेच दरवर्षी पावसाळ्यातील चार महिने पवना नदीपात्रातील पावसाच्या पाण्याचा उपसा महापालिकेकडून केला जातो. पावसाचे पाणी नदीला येण्याचे कमी झाल्यावर धरणातून पाणी सोडले जाते. दरमहा 10 टक्‍के लागणारे पाणी वर्षभर पिंपरी चिंचवड शहराला पुरते. 
पवना धरणात एक जून ते 23 जून या कालावधीत 196 मि.मि. पावसाची नोंद झाली. त्यावेळी धरणात 20.16 इतका पाणीसाठा शिल्लक होता. साधारणतः 300 मि.मि. पाऊस झाल्यानंतर धरणातील पाणीसाठ्यात वाढ होते.

1 जुलैपर्यंत 346 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्यात अवघी 1.3 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. यंदा सरासरी इतका पाऊस पडेल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. यामुळे जुलै महिन्यात पाऊस पडेल, या आशेवर महापालिकेने पाण्याबाबतच कोणतेही धोरण आखले नाही. मात्र जर जुलै महिन्यात पाऊस पडला नाही तर मात्र याबाबत हालचाली होऊ शकतात, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: 1.25 percent increase in pawana dam