पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात; 13 जखमी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 जानेवारी 2019

कळस : पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गागरगाव (ता. इंदापूर) गावच्या हद्दीत लोंढेवस्तीजवळ लक्झरी बस व मालवाहतूक टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात 13 जण जखमी झाले. हा अपघात शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडला असून, अपघातात जखमी झालेले सर्वजण खासगी लक्झरी बसमधील प्रवासी आहेत.
 
इंदापूर पोलिसांनी सागितले की, कुसेगाव, पाटस (ता. दौंड) येथून यात्रेतील पाळणा व खेळणीचे साहित्य घेवून जात असलेल्या मालवाहतूक आशयर टेम्पो (क्रं. एम.एच. 43 वाय 5237) इंदापूरच्या दिशेने निघाला होता. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पाठीमागून वेगाने आलेल्या लक्झरी बसने (क्रं. एम.एच.09, सी.वाय. 3699) टेम्पोला जोरात धडक दिली. यामध्ये टेम्पोची मागील बाजू बसच्या पुढील बाजूमध्ये गुंतूली गेली. दोन्ही चालकांचा ताबा सुटून दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्यातून खाली खड्ड्यात गेली.

यामध्ये टेम्पोचालक तानाजी कोळेकर (वय 25) यांसह बसमधील सजाबाई कांबळे (वय 45), साईनाथ राजगिर, फिरोज शेख (वय 28), महादेव म्हस्के (वय 80, रा. लातूर), रज्जाक पठाण (वय 45,रा. लातूर), मौला शेख (वय 28,रा. लातूर), दत्ता गायकवाड (वय 28,रा. लातूर), नामदेव जाधव (वय 54, रा. उदगीर), जरीबा पठाण (वय 35), दिगंबर नामदेव धुमकर हे जखमी झाले आहेत. त्यांना इंदापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

टेम्पोचालक तानाजी कोळेकर याने बसचालक दिगंबर गुमणवाड यांच्याविरुध्द फिर्याद दिली आहे. यानुसार इंदापूर पोलिस पुढील तपास करत आहेत

Web Title: 13 injured in luxury bus and tempo accident on Pune-Solapur highway