मेट्रोसाठी केंद्राकडून 1322 कोटींची तरतूद 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

पुणे - केंद्र सरकारने 2018-19 या आर्थिक वर्षाकरिता पुणे मेट्रोसाठी 1322 कोटी रुपयांची तरतूद केल्याचे अर्थसंकल्पातील नगर विकास विभागाच्या विविध तरतुदींमधून आढळून आले आहे, तर नागपूर मेट्रोसाठी 1500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (महामेट्रो) दोन्ही मेट्रो प्रकल्पांसाठी गेल्या वर्षीपेक्षा 979 कोटी रुपयांची तरतूद वाढीव झाली आहे. त्यामुळे शहरातील मेट्रो प्रकल्पाला गती मिळेल, असा विश्‍वास महामेट्रोकडून व्यक्त करण्यात आला आहे. 

पुणे मेट्रो प्रकल्पासाठी एकूण तरतूद एक हजार 322 कोटी रुपये आहे. त्यापैकी, 250 कोटी रुपये केंद्राकडून मिळणार आहेत. केंद्राने 169 कोटींची तरतूद केली आहे, तर चालू आर्थिक वर्षात विविध वित्तीय संस्थांकडून पुणे मेट्रो प्रकल्पासाठी 903 कोटी रुपयांचा कर्जपुरवठा (पास थ्रू असिस्टन्स) करण्यात येईल, असेही सरकारने म्हटले आहे. राज्य सरकारने पुणे मेट्रोसाठी 130 कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यामुळे मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून यंदा साडेचौदाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

पुणे मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी करणाऱ्या महामेट्रोने पहिल्याच वर्षी सुमारे 350 कोटी रुपये खर्च केले आहेत. मेट्रोच्या पिंपरी-स्वारगेट आणि वनाज-रामवाडी मार्गांवर यापूर्वीच काम सुरू झाले आहे. आता शिवाजीनगर-रामवाडी मार्गाचे काम लवकरच सुरू होणार असून, शिवाजीनगर-स्वारगेटदरम्यान भुयारी मेट्रो मार्गाचे काम जून महिन्यात सुरू होणार आहे. दोन्ही मार्गांवर मेट्रोच्या 15 स्टेशनच्या बांधकामाला गती देण्यात आल्याने चालू आर्थिक वर्षाकरिता केंद्राकडून 750 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. केंद्रीय अर्थसंकल्पात 2017-18 मध्ये नागपूर आणि पुणे मेट्रोसाठी अनुक्रमे 1350 आणि 500 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. 

Web Title: 1322 crores for the metro center