नवी पिढीच देशाचे भविष्य - प्रा. श्रीवास्तव

137 th ceremony of the NDA was passed on Friday
137 th ceremony of the NDA was passed on Friday

पुणे - ‘‘तंत्रज्ञानाचे महत्त्व आणि त्याचा योग्य वापर करणाऱ्या अधिकाऱ्यांची लष्कराला गरज आहे. एनडीएमधून प्रशिक्षण घेणारा प्रत्येक विद्यार्थी लष्कराच्या विविध दलांमध्ये प्रवेश घेत देशाचे नेतृत्व करण्यायोग्य ठरतो. ही नवीन पिढी देशाचे भविष्य असून यांना घडविण्यासाठी यांच्या मातापित्यांचे मोठे योगदान आहे,’’ असे प्रतिपादन नॉर्थ ईस्टर्न हिल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रा. एस. के. श्रीवास्तव यांनी केले. 

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १३७ व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा शुक्रवारी पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. ‘एनडीए’चे कमांडंट एअर मार्शल आय. पी. विपिन, डेप्युटी कमांडंट रिअर ॲडमिरल एस. के. ग्रेवाल, प्राचार्य ओमप्रकाश शुक्‍ला, विभागप्रमुख आणि प्रशिक्षक उपस्थित होते. 

विज्ञान शाखेचे (बीएससी) ४२, संगणक विज्ञानाचे ८५, कला शाखेचे (बीए) ८४ आणि अभियांत्रिकीचे (बीटेक) ७३ विद्यार्थी होते. सोहळ्यामध्ये विज्ञान शाखेत प्रथम आलेला छात्र अनुराग पांडे यास रौप्यपदक व चीफ ऑफ आर्मी स्टाफ ट्रॉफी, संगणक शाखेत प्रथम आलेला छात्र माझी गिरीधर यास रौप्य पदक आणि नेव्हल स्टाफ ट्रॉफी, कला शाखेत प्रथम आलेला छात्र सुमंत कुमार यास रौप्यपदक व एअर स्टाफ ट्रॉफी आणि अभियांत्रीकी  शाखेत प्रथम आलेला छात्र निशांत कुमार विश्‍वकर्मा यास रौप्यपदक व ॲडमिरल ट्रॉफी  देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com