आंबा महोत्सवात १४ कोटींची उलाढाल

आंबा महोत्सवात १४ कोटींची उलाढाल

मार्केट यार्ड - महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजनेंतर्गत आयोजित आंबा महोत्सवाला पुणेकरांनी मोठा प्रतिसाद दिला. एक एप्रिलपासून महोत्सवास सुरवात झाली. दोन महिन्यांत सुमारे १४ कोटी रुपयांची उलाढाल झाली.

गुलटेकडी मार्केट यार्डच्या प्रवेशद्वार क्रमांक ९ च्या पीएमटी बस डेपो शेजारी हा महोत्सव आयोजित केला होता. दररोज ८००-१००० ग्राहक या प्रमाणे साठ हजार जणांनी महोत्सवाला भेट दिली. सुमारे २.५ लाख डझन आंबा शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांना विकला, अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली. हापूस, केशर तसेच वनराज या जातीच्या आंब्याबरोबरच कोकणातील ओरिजनल आंबा शेतकऱ्यांकडून ग्राहकांना उपलब्ध झाला. 

कोकणातील ३३० हापूस आंबा उत्पादकांनी तर मराठवाडा तसेच स्थानिक ३७ केशर आंबा उत्पादकांनी महोत्सवात भाग घेतला. एक शाश्वत बाजारपेठ पणन मंडळाने उपलब्ध करून दिला. त्यामुळे उत्पादकांनी समाधान व्यक्‍त केले, अशी माहिती पणन मंडळाचे सरव्यवस्थापक दीपक शिंदे यांनी दिली. सुरवातीला प्रतवारीनुसार हापूसचे ७००-९०० रुपये प्रती डझन होते. अक्षय्य तृतीयानंतर हापूस आंब्याची आवक वाढली. परंतु ग्राहकसंख्याही वाढली व त्यामुळे दरामध्ये फारसा फरक पडला नाही. साधारणतः २० मे नंतर आवक जास्त वाढल्याने आंब्याचे दर प्रती डझन ४००-६०० रुपये होते.

हापूस आंब्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. सध्या २००-६०० रु. प्रति डझन आंब्याचे दर आहेत. उत्पादक स्वतः थेट ग्राहकांना विक्री करत आहेत. त्यामुळे ग्राहक व उत्पादक यांच्यामध्ये विश्वासाचे नाते निर्माण झाले. त्यामुळे दोनही घटकांना लाभ झाला.
- सुनील पवार,  कार्यकारी संचालक, पणन मंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com