लिम्का बुक आॅफ रेकाॅर्डसाठी चौदा तास अॅरोबीक्स

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

मांजरी (पुणे) : येथील पल्लवी बोरकर यांनी लिम्का बुक आॅफ रेकाॅर्डसाठी सलग चौदा तास अॅरोबीक्स हा व्यायाम प्रकार केला. मांजरी ग्रीन्स येथील क्लबहाऊसमध्ये लिम्का बुककडून परवानगी मिळाल्यानंतर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पल्लवी बोरकर या गेली दहा वर्षापासून महिलांना शारिरीक सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन करीत आहेत. या उपक्रमासाठी गेली अनेक महिने त्या सराव करीत होत्या. त्यांनी सलग चौदा तास हा व्यायाम केला. परिसरातील नागरिकांनी त्यांचे कौतुक केले. 

बोरकर म्हणाल्या, "फिटनेस क्षेत्रात महिलांनाही अनेक संधी आहेत. कुटुंबाची साथ मिळाल्यास त्यामध्ये त्या नावलौकीक मिळवू शकतात. मी सलग चौदा तास केलेल्या अॅरोबीक्स व्यायाम प्रकारामुळे त्याबाबत मोठा आत्मविश्र्वास निर्माण झाला आहे. लिम्का बुकमध्ये यापूर्वी अशा विक्रमाची नोंद नसल्याने त्यांच्याकडून मला संधी देण्यात आली आहे.''

Web Title: 14 hours aerobics for limca book of record by pallavi borkar