लोहीयानगर झोपडपट्टीत लागलेल्या आगीत 14 घरांचे नुकसान 

14 houses damaged in fire in Lohianagar slum
14 houses damaged in fire in Lohianagar slum

पुणे : भवानी पेठेजवळील लोहीया नगर झोपडपट्टीमध्ये सोमवारी रात्री लागलेल्या आगीमध्ये तब्बल 14 घरे जळाली. अग्निशामक दलाच्या मध्यवर्ती केंद्राच्यासमोरच्या गल्लीमध्येच आग लागल्याने अवघ्या काही मिनीटातच जवानानी घटनास्थळी पोचुन आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनेत एक व्यक्ती किरकोळ जखमी झाली.

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पटेल रुग्णालयात बसविणार ऑक्सिजन टँक

लोहियानगरमधील गल्ली क्रमांक 54 एचपीमध्ये सोमवारी साडे दहा वाजता घरामध्ये आग लागल्याची खबर अग्निशामक दलाच्या मध्यवर्ती केंद्राला मिळाली. संबंधीत घटना अग्निशामक केंद्राच्या समोरील गल्लीतच असल्याने फायरगाड्या काही वेळातच घटनास्थळी पोचल्या. मात्र छोटे रस्ते असल्यामुळे जवानानी पाण्याचे पाईप अंथरुन आगीच्या ठिकाणी पोचण्याचा प्रयत्न केला. आग मोठी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तेथे पाच फायरगाडया व दोन पाण्याचे टैंकर रवाना करण्यात आले.  त्यानंतर 30 तर 40 मिनीटात आगीवर नियंत्रण मिळविले.

Video: आता सिगारेटची थोटकंही मोजली जाणार; पुण्यात 'चॉक फॉर शेम' मोहिम

एका घरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली, मात्र घरात कागदी पुट्ठे ठेवण्यात आल्याने आगीने मोठ्या प्रमाणात पेट घेतला. या घटनेत किती नुकसान झाले, याची माहिती जमविण्याचे काम सुरु असल्याची माहिती अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यानी दिली.

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पटेल रुग्णालयात बसविणार ऑक्सिजन टँक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com