खडकवासला धरणातून 14 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग

राजेंद्रकृष्ण कापसे
मंगळवार, 17 जुलै 2018

पुणे - खडकवासला धरण साखळी क्षेत्रातील चारही धरणातील पावसाचा जोर दिवसापेक्षा रात्री थोडा कमी झाल्याने धरणात खडकवासला धरणातील विसर्ग मंगळवारी सकाळी आठ वाजता एकोणीस हजारावरुन 14 हजार क्यूसेक पर्यंत कमी करण्यात आला आहे. 

सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासून मंगळवारी सकाळी सहा वाजेपर्यंत चारी धरणात मिळून सुमारे सव्वा दोन टीएमसी पाण्याची वाढ झालेली आहे. चारही धरणात मिळून मंगळवारी 19.63 पाणीसाठा होता सोमवारी हा पाणीसाठा17.42 होता. म्हणजे सुमारे 2.21.टीएमसीने वाढ झाली आहे.

सोमवारी देखील अशाच प्रकारे सव्वा दोन टीएमसी पाण्याची वाढ झाली होती. टेमघर येथे 123 मिलिमीटर पानशेत येथ 151 मिलिमीटर, वरसगाव येथे 155 मिलिमीटर तर खडकवासला येथे 65 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद खडकवासला पाटबंधारे विभागाकडे करण्यात आली आहे 

सोमवारी दिवसभर पानशेत आणि खडकवासला परिसरात जोर होता. रात्री ही त्याच जोमाने पाऊस पडला. परंतु वरसगाव धरणात आणि टेमघर घालणार मात्र सकाळपेक्षा रात्रीचा पाऊस थोडा कमी झाला. पानशेत आणि वरसगाव धरणात सोमवारी रात्रीच्या बारा तासात सुमारे अर्धा टीएमसीने वाढ झाली आहे. खडकवासला धरण शंभर टक्के भरले नंतर त्या पाठोपाठ पानशेत धरण  देखील 100% होण्याच्या मार्गावर आहे.  आज सोमवारी सकाळी सहा वाजता पानशेत धरणात 82 टक्के पाणीसाठा झालेला आहे. टेमघर मध्ये 53,  वरसगावला 54 टक्के पाणीसाठा झालेला आहे.

Web Title: 14 thousand cusecs water from Khadakwasla dam