खडकवासला येथे 140 टक्के पाऊस तर टेमघर...

rain.jpg
rain.jpg

खडकवासला (पुणे) : खडकवासला पाटबंधारे विभागाच्या धरण साखळीतील चार धरणांपैकी खडकवासला येथे यंदा सरासरीच्या 140 टक्के तर सर्वात कमी पाऊस टेमघर येथे सुमारे 80 टक्के झाला आहे. 
धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसाचे मोजमाप एक जून पासून सूरू होते. त्यानुसार, एक जून पासून खडकवासला येथे यंदा 991 मिलिमीटर पाऊस झाला. येथील पावसाची सरासरी ही 705 मिलिमीटर आहे. (सरासरी ही मागील 10 वर्षात पडलेल्या एकूण पावसावरून काढली जाते.) यंदा खडकवासला येथे 140.56 टक्के पाऊस झाला आहे. म्हणजे 40 टक्के पाऊस जास्त झाला आहे. या धरणाची उपयुक्त साठवण क्षमता 1.97 टीएमसी आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पानशेत येथे एक जूनपासून दोन हजार 201 मिलिमीटर पाऊस झाला.  येथील पावसाची सरासरी ही दोन हजार मिलिमीटर आहे. त्यानुसार येथे 110.05 टक्के पाऊस झाला आहे. या धरणाची उपयुक्त साठवण क्षमता 10.65 टीएमसी आहे. वरसगाव येथे एक जूनपासून दोन हजार 092 मिलिमीटर पाऊस झाला. येथील पावसाची सरासरी दोन हजार 100 मिलिमीटर आहे. येथे आतापर्यंत 99. 61 टक्के पाऊस झाला आहे. या धरणाची उपयुक्त साठवण क्षमता 12. 82 टीएमसी आहे.

टेमघर येथे येथे एक जूनपासून दोन हजार 791 मिलिमीटर पाऊस झाला. येथील पावसाची सरासरी तीन हजार 500 मिलिमीटर पाऊस पडतो. आतापर्यंत या ठिकाणी 79. 74 टक्के पाऊस झाला आहे. या धरणाची उपयुक्त साठवण क्षमता 3. 71 टीएमसी आहे. या धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव ही तीन धरणं शंभर टक्के भरलेली आहेत. टेमघर धरण अद्याप 100 टक्के भरले नसल्याने या धरणातून पाणी सोडलेले नाही. 

 

 

पानशेत व वरसगाव या धरणातून सोडलेले पाणी खडकवासला धरणात जमा होते. खडकवासला धरणातून यंदा एक जूनपासून मिळून 11 टीएमसी पाणी मुठा नदी व कालव्यात सोडले आहे. हे पाणी शहराला आठ महिने पुरले असते. तर शेतीसाठी दोन आवर्तन झाली असती. चार ही धरणात मिळून सध्या 29. 07टीएमसी म्हणजे 99. 71 टक्के पाणी जमा झाला. सध्या तरी पुण्याला व शेतीला वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा जमा आहे.
-विजय पाटील, कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग 

 

खडकवासला पानशेत वरसगाव पेक्षा टेमघर धरणाचे पाणलोट क्षेत्र फार कमी आहे. टेमघरचे पाणलोट क्षेत्र 37. 70 चौरस किलोमीटर आहे. हे क्षेत्र कमी असल्यामुळे धरण भरण्यास उशीर लागतो. तसेच यंदा टेमघर परिसरात दरवर्षी प्रमाणे सलग संततधार पाऊस झालेला नाही. अजून ही 12 तासात सलग 70-100 मिलिमीटर पाऊस पडला की, धरण पूर्ण क्षमतेने भरेल.
टेमघर धरण आज 98.20 टक्के भरले आहे. 

-नामदेव करे, कार्यकारी अभियंता भामा आसखेड धरण विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com