लोहगाव विमानतळावरून पहिल्याच दिवशी तब्बल 'इतक्या' प्रवाशांची झाली वाहतूक!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

देशार्तंगत विमान वाहतुकीसाठी 3500 रुपये ते 10 हजार रुपयांच्या दरम्यान विमानाचे तिकिट असावे, असे केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

पुणे : लॉकडाउनमध्ये विमान वाहतूक सुरू झाल्यावर पहिल्या दिवशी लोहगाव विमानतळावरून 14 विमानांद्वारे 1463 प्रवाशांची वाहतूक झाली. बंगळूर, चेन्नई आणि कोलकत्ता मार्गावरील 12 फेऱ्या सोमवारी (ता.25) रद्द झाल्या.

- खुद्द शिक्षण विभागाचाच 'मराठी'वर घाला; वाचा सविस्तर बातमी

कोरानामुळे देशात 25 मार्चपासून लॉकडाउन सुरू झाल्यावर देशार्तंगत आणि परदेशातील विमान वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यातील देशार्तंगत वाहतूक सोमवारी सुरू झाली. त्यानुसार आज  दिल्ली, बंगळूरू, जयपूर, अहमदाबाद मार्गावरील विमान वाहतूक सुरू झाली. लोहगाव विमानतळावर दिवसभरात 7 विमाने आली आणि 7 विमाने रवाना झाली, अशी माहिती विमानतळाचे संचालक कुलदीपसिंग यांनी दिली. वाहतूक सुरू झाल्यावर दिल्लीवरून पहिले विमान इंडिगो या विमान वाहतूक कंपनीचे सोमवारी सकाळी आले. त्यात 23 प्रवासी होते.

- दहावी-बारावीच्या परीक्षा होणार; विद्यार्थ्यांना आपल्या शाळेतच परीक्षा देण्याची मिळणार संधी!

केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांनुसार भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) लोहगाव विमानतळावर 17 विमाने उतरविण्याची आणि 17 विमानांच्या उड्डाणांची तयारी करण्यात आली होती. मात्र, 12 मार्गावरील फेऱया प्रवाशांच्या पुरेशा संख्येअभावी रद्द झाल्या, असेही त्यांनी सांगितले. सायंकाळी सात वाजेपर्यंत 14 विमानांमधून 1463 प्रवाशांची वाहतूक झाली.

लोहगाव विमानतळावर आलेल्या प्रवाशांच्या हातावर आरोग्य प्रशासनाने होम क्वारंटाईनचे शिक्के मारले. त्यांना 14 दिवस त्यांच्याच घरात थांबण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी दिली.  

- नवीन बांधकाम प्रकल्प नियमावलीत अडकले; जुनी वापरता येईना, तर नवीन प्रसिद्ध होईना!

विमानतळावरून उतरलेल्या प्रवाशांना घरी जाण्यासाठी सिटी ग्लाईड ऑटोतर्फे रिक्षा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यासाठी 9859198591 हा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यावर दिवसभरात 286 प्रवाशांनी रिक्षासाठी मागणी नोंदविली होती, असे सिटीग्लाईडचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शितोळे यांनी दिली. विमानतळावर जाण्यासाठी आणि तेथून परतण्यासाठी  26 मे साठीही सुमारे 150 प्रवाशांनी संपर्क साधला आहे, असेही त्यांनी सांगितले.

देशार्तंगत विमान वाहतुकीसाठी 3500 रुपये ते 10 हजार रुपयांच्या दरम्यान विमानाचे तिकिट असावे, असे केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार विमान कंपन्यांनी पुणे- दिल्लीसाठी 6 ते 8 हजार रुपये, पुणे- बंगळूरूसाठी 3800 ते 6000 रुपये, पुणे- कोचीनसाठी 8000 ते 9000 रुपये, पुणे- अहमदाबादसाठी 4000 ते 5000 रुपये, पुणे- हैदराबादसाठी 6000 ते 8000 रुपये, आणि पुणे- चेन्नईसाठी 4500 ते 7500 रुपये तिकिट होते, अशी माहिती विमान वाहतूक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी दिली.

- विमान प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; आता त्यांना मिळणारा बोर्डिंग पास हा...!

Image may contain: one or more people and people standing

प्रवासी जाताना आणि येताना विमानतळ प्रशासनाने निर्जंतुकीकरणासाठी पूर्ण व्यवस्था केली होती. मास्क परिधान केलेल्या प्रवाशांनाच विमानतळावर प्रवेश देण्यात येत होता, असेही कुलदीपसिंग यांनी नमूद केले. तसेच रांगेत उभे न राहता प्रवाशांना बोर्डिंग पास देण्यात येत होता. सिक्युरिटी चेक इन एरियामध्येही प्रवाशांच्या सोशल डिस्टन्सिंगवर पूर्णपणे लक्ष देण्यात येत होते, असेही त्यांनी नमूद केले.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

लोहगाव विमानतळावर सोमवारी

एकूण प्रवासी आले - 531
रवाना झालेले प्रवासी - 932
एकूण आलेली विमाने - 7
रवाना झालेली विमाने - 7

- पुरेशा प्रवासी संख्येअभावी रद्द झालेली विमाने
- चेन्नई - पुणे - चेन्नई
- कोलकत्ता - पुणे - कोलकत्ता
- बंगळूरू - पुणे - बंगळूरू

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1463 passengers were transported by 14 planes from Lohegaon Airport