व्हॉट्‌सॲपद्वारे १५ लाखांची कामे

पुणे - व्हॉट्‌सॲप ग्रुपद्वारे विविध सामाजिक कार्य करणारे कॉम्पिटिटर्स फाउंडेशनचे सदस्य.
पुणे - व्हॉट्‌सॲप ग्रुपद्वारे विविध सामाजिक कार्य करणारे कॉम्पिटिटर्स फाउंडेशनचे सदस्य.

घोडेगाव - सोशल मीडियाचा सकारात्मक वापर केला तर काय होऊ शकते हे याचे एक चांगले उदाहरण पुढे आले आहे. कॉम्पिटिटर्स फाउंडेशन (जयकर परिवार) या व्हॉट्‌सॲप ग्रुपने आपल्या कामातून तरुण वर्गापुढे आदर्श निर्माण केला आहे. आतापर्यंत या ग्रुपने १० ते १५ लाख रुपयांची कामे केली आहेत.

मे २०१६ मध्ये या ग्रुपची स्थापना झाली. त्यापूर्वी दोन वर्षे व्हॉट्‌सॲप ग्रुप ज्ञानेश्वर हिंगे (उपायुक्त जीएसटी) यांनी सुरू केला होता. ज्या वेळी या ग्रुपमध्ये रवींद्र वायाळ (आयआरबी कंपनीचे सरव्यवस्थापक) आले, त्यांनी या सोशल मीडियाचे स्वरूपच बदलले. वायाळ यांच्यासह त्यांचे मित्र प्रशासकीय अधिकारी आनंद पाटील, डॉ. संजयकुमार भोसले, सर्वोच्च न्यायालयाचे वकील ॲड. रवींद्र अडसुरे, राहुल वाणी यांनी सामाजिक जाणिवेतून विविध समाजोपयोगी कामे करण्यासाठी कॉम्पीटीटर्स फाउंडेशन या नावे सामाजिक संस्था सुरू केली. सभासद वर्गणी प्रत्येकी ५ हजार ५०० रुपये जमा करण्यास आवाहन केले. बोलता बोलता सात लाख जमा झाले. या माध्यमातून १५० सदस्य झाले. सीएफ संघटनेच्या सदस्यांनी त्यातून विविध समाज उपयोगी कामे केली आहेत. नांदेड येथे गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केले आहे. दोन वर्षात तेथील ३०० विद्यार्थ्यांनी त्यांचा लाभ घेतला आहे. लातूर येथील विठ्ठलवाडी या गावामध्ये मोफत बी बियाणे, खते, औषध वाटप करून येथील शेतकऱ्यांना शेती मार्गदर्शन केले आहे. तसेच १०० गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप केले आहे. नुकताच आंबेगाव तालुक्‍यात रुग्णवाहिका भेट देण्याचा कार्यक्रम झाला.

तुम्ही योग्य व सकारात्मक वापर केल्यास इंटरनेट, व्हॉट्‌सॲप, फेसबुक ही माध्यमे चांगली आहेत. या माध्यमातून मी माझ्या मित्रांच्या साह्याने भामरागड (गडचिरोली) या भागातील आदिवासींना कपडे वाटप केले आहे. बावधन येथील मतिमंद मुलांच्या शाळेस सुमारे दोन लाख रुपयांच्या गरजेच्या वस्तू दिल्या आहेत. 
- रवींद्र वायाळ, सरव्यवस्थापक, आयआरबी कंपनीचे 

नानवीज येथे ५००० वृक्ष लागवड
नानवीज (ता. दौंड) येथे तत्कालीन प्राचार्य विजयकुमार मगर, आयएएस अधिकारी आनंद पाटील, संदीप भुजबळ, मनोज देवणे आणि सीएफ सदस्यांच्या प्रयत्नांतून ५००० वृक्ष लागवड करून त्यांची जोपासना केली आहे. अशा प्रकारे सोशल मीडियाचा सुनियोजित, सकारात्मक वापर केल्यास तुम्ही समाज सुधारू शकता. समाजोपयोगी कामे करू शकता हेच कॉम्पीटीटर्स फाउंडेशनच्या माध्यमातून सदस्यांनी दाखवून दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com