खडकवासल्यात सकाळपासून 15 टक्के मतदान

राजेंद्रकृष्ण कापसे
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

खडकवासला विधानसभा मतदारसंघात सकाळी 7 ते 11 या पहिल्या चार तासात 15.54 टक्के मतदान झाले आहे. सकाळच्या टप्यात मतदान करणाऱ्यांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांची संख्या जास्त आहे.

खडकवासला (पुणे) : खडकवासला विधानसभा मतदारसंघात सकाळी 7 ते 11 या पहिल्या चार तासात 15.54 टक्के मतदान झाले आहे. सकाळच्या टप्यात मतदान करणाऱ्यांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांची संख्या जास्त आहे.

एकूण 4लाख 86 हजार मतदारांपैकी 75 हजार 668 जणांनी मतदान केले आहे. यामध्ये पुरुष  47हजार244, महिला 28हजार424 यांनी मतदान केले आहे. 
भाजपचे उमेदवार आमदार भीमराव तापकीर यांनी सकाळीच धनकावडीतील प्रियदर्शनी शाळेत पत्नी समवेत जाऊन मतदान केले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नगरसेवक सचिन सचिन दोडके यांनी वारजे येथील राघवदास विद्यालयात पत्नीसह जाऊन मतदान केले. बसपाचे उमेदवार दीपक बलाढे यांनी रामनगर शाळेत जाऊन मतदान केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 15 percent voting in khadakwasla for assembly elections