पुरंदरसह 15 गावे 56 वाड्या तहानलेल्या 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

पुणे - उन्हाच्या पाऱ्याबरोबरच पाणीटचांईचे संकटही वाढत चालले आहे. पुणे विभागात सध्या पुरंदर तालुक्‍यासह 15 गावे आणि 56 वाड्या तहानलेल्या असून, त्या गावांमध्ये 12 टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत पाणीटंचाईची तीव्रता कमी आहे. 

पुणे विभागातील या गावांमध्ये सुमारे 18 हजारांहून अधिक नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या विभागात सद्यःस्थितीत सर्वाधिक 11 टॅंकर सातारा जिल्ह्यात सुरू आहेत. माण तालुक्‍यात सात टॅंकर, तसेच खटाव, कोरेगाव, पाटण आणि महाबळेश्‍वर तालुक्‍यांत प्रत्येकी एक टॅंकर सुरू आहे. पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्‍यात एका टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 

यंदा टॅंकरची संख्या कमी 
गतवर्षी झालेला समाधानकारक पाऊस, राज्य सरकारचे जलयुक्‍त शिवार अभियान, तसेच स्वयंसेवी संस्थांकडून सुरू असलेल्या कामांमुळे पाणीटंचाईची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे यंदा पुणे विभागात टॅंकरची संख्या घटल्याची माहिती विभागीय आयुक्‍तालयातील सूत्रांनी दिली.

Web Title: 15 villages with Purandar 56 wadya Water shortage