दीडशे गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात

Police
Police

पुणे - शहरातील वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्‍वभूमीवर परिमंडळ पाचच्या अंतर्गत पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये दोनदिवसीय ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबविले. त्यामध्ये शहरातील पावणेपाचशे सराईत गुन्हेगारांपैकी १५५ गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकले. याबरोबरच पिस्तूल बाळगणारे तिघे, तडीपार आदेशभंग करणारे दोघे आणि घरफोडीच्या गुन्ह्यातील एकास अटक करण्यात आली. 

शहरात काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात घडलेले गुन्हे व आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त सुनील फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी सहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबविले. त्यामध्ये हडपसर, मुंढवा, वानवडी, कोंढवा, मार्केट यार्ड, बिबवेवाडी या पोलिस ठाण्यांच्या अंतर्गत ते राबविण्यात आले. मंगळवारी रात्री दहा ते बुधवारी पहाटे चार आणि बुधवारी रात्री दहा ते गुरुवारी पहाटे ४ वाजेपर्यंत ही मोहीम राबविण्यात आली.

परिमंडळ पाचमध्ये पावणे पाचशेहून अधिक सराईत गुन्हेगार फरारी होते. त्यापैकी १५५ जण मोहिमेदरम्यान पोलिसांना सापडले. त्याचबरोबरच बेकायदा शस्त्र बाळगणारे शुभम पवार (वय २१) यास हडपसरमधून, तर  शेखर चन्नाप्पा शिंगे (वय २६) व शिवराज माने (वय २९) यास बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून पकडण्यात आले. 

तडीपार आदेश भंग केल्याप्रकरणी संदीप करुल (वय २८) यास कोंढव्यातून, तर आकाश ठाकूर यास मुंढव्यातून ताब्यात घेण्यात आले. तिलकीसिंग गब्बरसिंग टाक (वय २७) यास वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून पकडण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com