लघुउद्योजकांना दीडशे कोटींचा फटका

लघुउद्योजकांना दीडशे कोटींचा फटका

पिंपरी - राज्य सरकारने केलेल्या वीजदरावाढीमुळे शहरातील दहा हजार लघुउद्योजकांना गेल्या सहा महिन्यात १५० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. वीज बिलासाठी आकारण्यात येणाऱ्या नव्या दरामुळे या उद्योजकांना प्रत्येक महिन्याला २५ कोटी रुपयांचा जादा रकमेचा भुर्दंड सोसावा लागत आहे, त्यामुळे व्यवसाय कसा करायचा, असा प्रश्‍न त्यांच्या समोर निर्माण झाला आहे. 

ऑगस्ट महिन्यात सरकारने वीजदरामध्ये वाढ केली आहे. उद्योगासाठी वीज आवश्‍यक असून, तडजोड करणे शक्‍य नसल्याने त्यांनी आर्थिक भुर्दंड सहन करत व्यवसाय सुरू ठेवले आहेत. खर्च वाढल्याने नफ्याचे प्रमाण वार्षिक पाच टक्क्यांनी कमी झाले आहे. दरवाढ कमी करावी, म्हणून राज्य सरकारकडे मागणी केली. मात्र, काहीच साध्य झाले नाही. उद्योगांवर येणारा भार कमी करण्यासाठी राज्य सरकारने तीन हजार ४०० कोटी रुपयांचे अनुदान महावितरणला दिल्यास २०२० पर्यंत विजेच्या दरात वाढ करण्याची गरज पडणार नाही.

भोसरीत सर्वाधिक लघुउद्योजक
शहरात सर्वाधिक लघुउद्योजक भोसरी एमआयडीसी परिसरात आहेत. तसेच तळवडे, कुदळवाडी, चिखली, पिंपरी-चिंचवड एमआयडीसी भागात लघुउद्योजक कार्यरत आहेत.

विजेच्या दरात झालेल्या वाढीमुळे लघुउद्योजक अडचणीत सापडले आहेत. उद्योगांसाठी पूर्वी पॉवर फॅक्‍टर पेनल्टीचा नियम होता, तो पुन्हा सुरू करावा. महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांमध्ये वीज स्वस्त आहे. 
- संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com