वारजे-कर्वेनगर परिसरात कोरोना रुग्णांनी दीड हजारचा टप्पा...

corona virus.jpg
corona virus.jpg

वारजे (पुणे)  : वारजे- कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत कोरोना ग्रस्तांची संख्या 1500 पार केलेली आहे. तर आठ दिवसांमध्ये कोरोना रुग्णामध्ये जवळपास चार पट वाढ झालेली आहे. त्यामुळे वारजे, कर्वेनगर, शिवणे व उत्तमनगरवासियांची डोकेदुखी वाढलेली आहे. वारजे- कर्वेनगर मध्ये 15 जुलै पर्यत एकूण 1569 कोरोनाग्रस्त पेशंट सापडले असून त्यामधील 803 नागरिक कोरोनातून बरे झाले आहेत. तर आता 747 रुग्ण  रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आतापर्यंत 19 रुग्णांचा मृत्यू  झालेला आहे, अशी माहिती वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संतोष वारुळे यांनी दिली. यामध्ये प्रभाग क्रमांक 13 मध्ये 628 प्रभाग क्रमांक 31मध्ये  388,  प्रभाग क्रमांक 32 मध्ये 363 व प्रभाग क्रमांक 42 चा  शिवणे भागात 119 तर उत्तमनगर भागामध्ये 71 कोरोनाग्रस्त रुग्णांचा समावेश आहे. 12 जुलै रोजी येथील कोरोनाग्रस्त 1238  होते. आज मात्र कोरोनाग्रस्तांचा आकडा 1569 झालेला आहे. अवघ्या तीन दिवसात 331 रुग्णांची भर पडली आहे.

दररोज या भागात कोरोना रुग्णांची संख्या 100 पेक्षा जास्त संख्येने वाढत असल्याचे सध्या तरी चित्र आहे. त्यामुळे वारजे कर्वेनगर मध्ये कोरोना रुग्ण संख्या वाढण्याचे प्रमाण चार ते पाच पट झालेले आहे.  त्यामुळे वारजे, कर्वेनगर, शिवणे, उत्तमनगर  वासियांनी काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच लॉकडाऊनचे नियम तंतोतंत पाळणे गरजेचे आहे. तरच वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा बसू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com