बोगस कामगारांच्या नावाने क्रेडिट कार्डद्वारे 16 लाखांना गंडा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

पुणे - कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी बोगस कामगारांच्या नावाने बनावट क्रेडिट कार्ड बनवून एका क्रेडिट कार्ड वितरक कंपनीची तब्बल 15 लाख 86 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. त्यापैकी साडेपाच लाख रुपयांहून अधिक रक्कम ही महागडे मद्य, पेट्रोल, सोन्या-चांदीचे दागिने आणि शॉपिंगवर खर्च केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

याप्रकरणी ऑलविन पाटेकर (वय 42, रा. विरार वेस्ट) यांनी एका महिला व पुरुषाविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पाटेकर हे एसबीआय कार्ड ऍण्ड पेमेंटस्‌ सर्व्हिस कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहेत. कोरेगाव पार्क येथील मंगलदास रस्त्यावरील सुयोग प्लॅटिनम टॉवरच्या सहाव्या मजल्यावर कंपनीचे कार्यालय आहे. संबंधित कंपनीकडून एसबीआयच्या क्रेडिट कार्ड वितरणाचे काम केले जाते. मागील आठवड्यात कंपनीमध्ये कंत्राटी पद्धतीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनीच 26 बनावट क्रेडिट कार्डद्वारे 15 लाख 86 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार पुढे आला. क्रेडिट कार्डद्वारे फसवणूक करणाऱ्यांनी एमएसडब्ल्यू आनंद यांच्याकडे दहा लाख 26 हजार 640 रुपयांची रक्कम वर्ग केली. त्यानंतर पाच लाख 60 हजार रुपयांहून अधिक रक्कम ही वाइन शॉप्स, पेट्रोल पंप, ज्वेलरी व शॉपिंग अशा स्वरूपाच्या खरेदीसाठी वापरली. अशाप्रकारे कंपनीची सोळा लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीने कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या दोन संशयित कर्मचाऱ्यांविरुद्ध कोरेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

...अशी झाली फसवणूक 
एका खासगी कंपनीतील कामगारांच्या बनावट नावाने सप्टेंबर ते नोव्हेंबर 2017 या तीन महिन्यांत बनावट क्रेडिट कार्ड तयार करण्यात आले. 26 पैकी 17 क्रेडिट कार्डसाठी आवश्‍यक कागदपत्रे, पत्ता एकसारखाच वापरण्यात आला. याच पत्त्यावर क्रेडिट कार्ड स्वीकारण्यात आल्याचे कंपनीस आढळून आले. कंपनीने या प्रकरणाची अंतर्गत चौकशी केली, त्या वेळी ज्या कामगारांच्या नावाने क्रेडिट कार्ड होते, ते कामगारच संबंधित कंपनीत काम करत नसल्याचे उघड झाल्याने फसवणूक केल्याचे उघडकीस आले. 

Web Title: 16 lakhs by credit card in the name of bogus workers