मेट्रो मार्गावरील सोळाशे इमारतींचे ‘स्ट्रक्‍चरल ऑडिट’ पूर्ण

Mahametro
Mahametro

भुयारी मेट्रोसाठी बोगदा खोदताना नागरिकांच्या मालमत्तेची हानी होऊ नये, यासाठी महामेट्रोने मेट्रो मार्गावरील सुमारे १,६०० इमारतींचे ‘स्ट्रक्‍चरला ऑडिट’ नुकतेच पूर्ण केले आहे. त्यातील १६ इमारतींबाबत काळजी घ्यावी लागेल, असे महामेट्रोने महापालिका तसेच संबंधित इमारतींच्या मालकांना कळविले आहे. 

याविषयी महामेट्रोचे प्रकल्प व्यवस्थापक अतुल गाडगीळ म्हणाले, की भुयारी मेट्रोसाठी खोदाई होताना मार्गावरील सर्व इमारतींचे, घरांचे ‘स्ट्रक्‍चरल ऑडिट’ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील इमारतींचा आराखडा महापालिकेला नुकताच सादर करण्यात आला आहे.

जमिनीपासून सुमारे २० ते २२ मीटर खाली मेट्रोचा मार्ग असेल. दोन ट्यूबमधून मेट्रो धावणार असून, मेट्रोची स्थानकेही जमिनीपासून २२ ते २४ मीटर खोलवर असतील. जमिनीवरील घरे, दुकाने आदींना धक्का लागणार नाही. त्यासाठी तांत्रिक तपासणी दोन वेळा झाली आहे. त्यानंतरच मेट्रोचा मार्ग निश्‍चित करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com