अष्टविनायक मार्गाच्या 161 कोटी खर्चाच्या कामाचा शुभारंभ

अष्टविनायक मार्गाच्या 161 कोटी खर्चाच्या कामाचा शुभारंभ

लोणी काळभोर : हायब्रिड अॅन्युईटी उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील अष्टविनायक मार्गाची सुधारणा करण्याच्या कामाचा भुमिपुजन समारंभ थेऊर (ता. हवेली) येथे राज्याचे महसुल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते बुधवारी (ता. 12) पार पडला. थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना आगामी विधानसभा निवडणुकीपुर्वी कसल्याही परिस्थितीत चालू करण्यार असल्याची ग्वाही या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांना दिली.

शिरूर-हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यकमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय उर्फ बाळा भेगडे, उपाध्यक्ष दादासाहेब सातव, भाजपचे हवेली तालुकाध्यक्ष रोहिदासशेठ उंद्रे, महिला अध्यक्षा राजश्री काळभोर, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन चौधरी, व्यापारी आघाडीचे विकास जगताप, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटनिस पुनम चौधरी, जिल्हा परीषद सदस्या सुनंदा शेलार, पंचायत समिती सदस्या कावेरी कुंजीर, माजी सदस्य हिरामण काकडे, महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष तात्यासाहेब काळे, थेऊरच्या सरपंच अलका कुंजीर, उपसरपंच भाऊसाहेब काळे आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, भाविकांना अष्टविनायक दर्शन सुखकर व्हावे यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हायब्रिड अॅन्युईटी कार्यक्रमांतर्गत अष्टविनायक मार्गाच्या २८१ किलोमीटर लांबीसाठी सुमारे ८६१ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.  यात पुणे जिल्ह्यातील सुमारे ४३ किलोमीटर मार्गाचा समावेश आहे. पुर्वीच्या काळात रस्तांच्या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्यामुळे, रस्त्यांची कामे चांगल्या दर्जाची होत नव्हती.

मागील दहा वर्षांचा विचार केला कर वाहने भरमसाठ स्वरुपात वाढली, मात्र रस्ते तेवढेच राहिले. यातुन मार्ग काढण्यासाठी हायब्रिड अॅन्युईटी कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हायब्रिड अॅन्युईटी कार्यक्रम म्हणजे उधारीवर रस्ताची कामे करणे आहे. रस्ता करणाऱ्याला साठ टक्के रक्कम दोन वर्षात उर्वरीत रक्कम पुढील दहा वर्षात द्यावी लागणार आहे. यातुन राज्यातील दहा हजार किलोमीटर लांबीचे रस्ते करण्यात येणार असुन, त्यासाठी तीस हजार कोटी लागणार आहेत. मात्र हायब्रिड अॅन्युईटी कार्यक्रमांतर्गत करण्यात येणाऱ्या रस्तावर कसलाही टोल असणार नाही असेही पाटील यांनी यावेळी स्पष्ठ केले.

स्थानिक आमदार बाबुराव पाचर्णे म्हणाले, राज्य शाशनाच्या माध्यमातुन शिरूर हवेलीतील रस्तासाठी तब्बल १६० कोटींचा निधी  मिळाला आहे. नगररस्त्यावरील कोंडी सोडवण्यासाठी तातडीची मदत म्हणन सहा पदरीकरणासाठी केंद्र शासनाने २२४ कोंटी मंजूर केले आहेत. दरम्यान कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्वप्नील उंद्रे यांनी केले तर आभार कार्यकारी अभियंता मिलींद बारभाई यांनी मानले. 

यशवंत सुरु करणार

यशवंत सहकारी साखर कारखान्याबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, यशवंत सुरु करण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न केलेले आहेत. मात्र कांही कारणास्तव कारखाना अद्याप चालु होऊ शकलेला नाही. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कारखान्याची कांही जमिन ड्रायपोर्टच्या कामासाठी खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. तर आनखी एक चांगला प्रस्ताव शासनाकडे आलेला आहे. दोन्ही प्रयायांचा योग्य विचार करुन, आगामी विधानसभा निवडणुकीपुर्वी कसल्याही परिस्थितीत चालु करणार हे नक्की.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com