इंदापूरसाठी 26 लाख 52 हजार रुपयांचे 17 हायमास्ट दिवे

राजकुमार थोरात
मंगळवार, 29 मे 2018

वालचंदनगर (पुणे) : पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यामधील 16 गावांमध्ये 26 लाख 52 हजार रुपये किमतीचे 17 हायमास्ट दिवे मंजूर झाले असून दिवे बसविण्याचे काम सुरु आहे. हायमास्टमुळे तालुक्यातील 16 गावे पहिल्या टप्प्यांमध्ये उजळणार असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आराेग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी दिली.

माने यांनी सांगितले की, इंदापूर तालुक्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन जास्तीजास्त विकास निधी आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. तालुक्यातील जास्तीजास्त रस्त्यांची कामे, आरोग्य सेवा मजबुत करण्याचे  प्रयत्न माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या माध्यमातुन सुरु आहेत. झेडपीतील ग्रामपंचायत विभागाच्या माध्यातुन 16 गावांसाठी 17 हायमास्ट दिवे मंजूर केले असून ते बसविण्याचे काम सुरु आहे. यातील एका दिव्याची किमंत 1.56 लाख रुपये असून तालुक्यामध्ये 26 लाख 52 हजार  रुपयांचे दिवे बसविण्यात येणार असल्याने तालुका उजळणार आहे. 

हायमास्ट मंजूर असलेल्या गावांची नावे पुढील प्रमाणे -
लाकडी, पणदरवाडी, शेळगाव, घोलपवाडी, बावडा, वालचंदनगर, सणसर, अंथुर्णे, भादलवाडी, रुई, नरुटवाडी चौक, पळसदेव, लोणी देवकर, गोखळी मदनवाडी 

Web Title: 17 highmast lights for indapur of rupees 26 lacks 52 thousand