नवीन सभासदांसाठी 17 जून अंतिम तारीख 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

पुणे - पन्नास वर्षे वयावरील व्यक्तींसाठी असलेल्या "सकाळ' व "सह्याद्री हॉस्पिटल'च्या सुरक्षा कवच योजनेच्या नवीन सभासदांसाठी अंतिम मुदत रविवारी (ता. 17) संपत आहे. त्यानंतर मुदतवाढ नाही. 

पुणे - पन्नास वर्षे वयावरील व्यक्तींसाठी असलेल्या "सकाळ' व "सह्याद्री हॉस्पिटल'च्या सुरक्षा कवच योजनेच्या नवीन सभासदांसाठी अंतिम मुदत रविवारी (ता. 17) संपत आहे. त्यानंतर मुदतवाढ नाही. 

या योजनेतील दीड लाख रुपयांची विमा मर्यादा आता दोन लाखांपर्यंत, तर औषधांसाठीची सवलत 15 टक्‍क्‍यांपर्यंत वाढविली आहे. याशिवाय विविध वैद्यकीय सेवांवर 20 ते 75 टक्‍क्‍यांपर्यंत सवलत, तज्ज्ञांचा सल्ला, प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप कार्ड, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, कॅथेटर अँजिओग्राफीसाठी विशेष पॅकेज आदी सुविधांचाही लाभ घेता येणार आहे. सभासदांना "सकाळ'तर्फे आठ दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचाही आस्वाद घेता येईल. या योजनेत 2009 पासून एकदाही आंतररुग्ण सेवा न घेणाऱ्या सभासदांसाठी विमा मर्यादा दोन लाख 30 हजार रुपये आहे. सभासदांच्या 50 वर्षे वयाखालील नातेवाइकांना वा परिवारातील व्यक्तींनाही सवलत आहे. 

मी गेल्या 11 वर्षांपासून नियमित सभासद असून दरवर्षी या योजनेत न चुकता सहभागी होतो. आतापर्यंत मला सेवा घ्यावी लागली नाही; तरीही मी दरवर्षी सभासद होतो. ही योजना अत्यंत उपयुक्‍त असून वेळोवेळी मी सर्व तपासण्यांचा लाभ घेतला आहे. महागाईच्या काळात सकाळ सह्याद्री सुरक्षा कवचतर्फे स्तुत्य उपक्रम राबविले जातात, याचा मला अभिमान वाटतो. 
- माधव वामन दातार 

नोंदणीसाठी हे करा... 
- वय वर्षे 50 ते 69 साठी : 3500 रुपयांचा धनादेश सह्याद्री हॉस्पिटल्स लि. या नावे अधिक 800 रुपयांचा धनादेश "सकाळ मीडिया प्रा. लि.' या नावाने द्यावा. 
- वय वर्षे 70 व अधिक - 4600 रुपयांचा धनादेश सह्याद्री हॉस्पिटल्स लि. या नावे अधिक 800 रुपयांचा धनादेश "सकाळ मीडिया प्रा. लि.' या नावे द्यावा. 
- नोंदणीशुल्क रोखीनेही भरता येईल. 

- नोंदणीची ठिकाणे - सह्याद्री हॉस्पिटल, डेक्‍कन जिमखाना- कर्वे रस्ता. कोथरूड- पौड रस्ता, वनाजसमोर. बिबवेवाडी- सुहाग मंगल कार्यालयाशेजारी. हडपसर- भोसलेनगर. नगर रस्ता- हर्मिस हेरिटेज फेज 2. शास्त्रीनगर- येरवडा. शनिवारवाड्याजवळ- कसबा पेठ. 
- संपर्क - www.sahyadrihospital.com व 7798330123 किंवा 7798320123 (स. 9.30 ते सायं. 5.30)

Web Title: 17 June last date for Sakal Sahyadri Suraksha Kawach new membersship