पुणे जिल्ह्यात १७९५ नवे कोरोना रुग्ण; आज ९४२५ चाचण्या

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 11 October 2020

पुणे जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात १ हजार ७९५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आजच्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील ७०३ जण आहेत. यामुळे जिल्ह्यातील आज अखेरपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ३ लाख ५ हजार १४४ झाली आहे. आज ८  हजार ४२५ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

पुणे - जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात १ हजार ७९५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आजच्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील ७०३ जण आहेत. यामुळे जिल्ह्यातील आज अखेरपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ३ लाख ५ हजार १४४ झाली आहे. आज ८  हजार ४२५ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, गेल्या २४ तासांत २ हजार ८४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता २ लाख ६५ हजार ४३६ झाली आहे. याशिवाय दिवसभरात ४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आतापर्यंत झालेल्या मृत्यूंची संख्या ७ हजार ११४ झाली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमध्ये ४४०, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ४९२, नगरपालिका क्षेत्रात ११४ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ४६ नवे रुग्ण सापडले आहेत.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1795 new corona patinets found in pune district